वीर बापूराव पूलेश्वर शेडमाके यांच्या 164 व्या शहीद दिना निमित्त आम आदमी पार्टी तर्फे विनम्र अभिवादन
857 च्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिवीर बाबुराव भुलेश्वर शेडमाके यांची 164 वा शहीद दिन आम आदमी पार्टी चंद्रपूर च्या वतीने क्रांतिवीर शाहिद बाबुराव शेडमाके स्मारक जिल्हा कारागृह येथे पार पाडण्यात आला. या वेळेला1857 मधील प्रथम क्रांतिवीर बाबूराव पुल्लेशुर शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी अभिवादन…….
चंद्रपूर शहरातील गोंड राजाचा राजवाडा म्हणजेच आताचे मध्यवर्ती कारागृह त्या परिसरातील झाडाला ब्रिटिश सरकारने क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांना 21 ऑक्टो.1857 ला फाशी देण्यात आली.
त्याचीच आठवण म्हणून महाराष्ट्रातील आदिवासींच्या भावना त्यात गुंतल्या असल्याने लाखो लोक ह्याच दिवशी क्रांतिवीर बाबूराव शेडमाके यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.
अभिवादन करताना आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे जिल्हा सचिव संतोषजी दोरखंडे, शहर सचिव राजु कुडे, शहर संघटन मंत्री सुनिल भोयर, झोन अध्यक्ष रहेमान खान, झोन अध्यक्ष राजु भाऊ चौरीया , सुनिल सदभय्या, योगेश मुर्हेकर, योगेश गोखरे, सुभाष दुर्योधन, प्रदिप वाळके, मधुकर साखरकर, अजय बाथव तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.