रक्त संयोजक रिंकू कुमरे यांचा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते सत्कार…
चंद्रपूर, 18 ऑक्टोम्बर : जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपल्या कार्यातून नेहमी समाजसेवा करणारे, आदर्श स्थान असणारे राज्याचे वन व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सांस्कृतीक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची प्रेरणा घेऊन उभारलेली समाज सेवी संस्था श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर द्वारे 15 ऑक्टोम्बरला बल्लारपूर मधील रिंकू कुंमरे यांचा मुनगंटीवार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
रक्ता विना जीवन नाही. रक्ताची टंचाई सर्वत्र असून सुद्धा रिंकू कुंमरे हें सदैव जनतेच्या मदतीसाठी व ज्या व्यक्तीला रक्ताची अत्यंत गरज आहे अशा आजारी व्यक्तींना रक्ताची उपलब्ध करून देतात. अशातच गोंदिया जिल्ह्यामधील एका 17 वर्षीय मुलीला एका दुर्धर आजाराने ग्रासले असून तिला गोंदिया येथे उपचाराकरिता दवाखान्यात आणण्यात आले होते. तिला एका अनमोल व दुर्मिळ अशा म्हणजेच A2B positive या रक्ताची अत्यंत गरज होती अन्यथा तिचा जीव वाचणे शक्य नव्हते. A2B positive या गटाचे रक्त संपूर्ण जगात खूपच दुर्मिळ प्रमाणात मिळते. ही संपूर्ण माहिती बल्लारपूर शहरातील रक्त संयोजन करणारे रिंकू कुमरे यांना मिळताच त्यांनी मध्यप्रदेश येथील भोपाळ या शहरात राहणारे हितेश अरोरा यांच्याशी सम्पर्क साधला व त्यांना भोपाळ येथून नागपूरला बोलावून घेतले. स्वतः तेथे जाऊन A2B positive हे अनमोल रक्त आजारी मुलीला गोंदिया दवाखान्यात उपचारासाठी ठेवले होते तेथे पोहचविले. एका गरीब घरच्या मुलीला जीवनदान दिले.
हितेश अरोरा यांचे आभार मानून त्यांना भोपाळ साठी रवाना केले. त्याच्या याच कार्याला श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब चा मनाचा मुजरा करण्यात आला. या त्याच्या कार्याची दखल घेऊन मुनगंटीवार यांनी रिंकू कुमरे यांचा सत्कार केला. या सत्कार कार्यात श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर चे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, पूनमचंद बहुरिया, सुधाकर सिक्का, रिंकू गुप्ता आदी उपस्थित होते.