ग्राम पंचायत निवडणूकीत चंद्रपूर जिल्हयात भाजपा क्रमांक १ चा पक्ष
९४ पैकी ४७ जागांवर विजय संपादन
हा तर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीचा विजय – देवराव भोंगळे
चंद्रपूर जिल्हयात ग्राम पंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टी प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला असून ९४ ग्राम पंचायतींपैकी भारतीय जनता पार्टीने ४० जागांवर विजयी मिळविला तर युतीमध्ये ०७ जागांवर विजय मिळवित ४७ जागांवर विजय प्राप्त करत भाजपाने अव्वल स्थान राखले आहे. भारतीय जनता पार्टीचा हा विजय लोकनेते श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीचा विजय असून यापुढील काळातही चंद्रपूर जिल्हयाच्या ग्रामीण भागाचा विकास आम्ही अधिक वेगाने करू असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हयातील ९४ ग्राम पंचायतीच्या निवडणूकीपैकी भाजपाने ४० जागा व युतीत ७ जागा असे एकूण ४७ जागांवर विजय मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. राजुरा तालुक्यात भाजपाने ०८ तर युतीत ०५ अशा एकूण १३, मुल येथे १, भद्रावती येथे २, चिमूर येथे ४, कोरपना येथे १२ तर जिवती येथे १५ जागांवर भाजपाने विजय संपादन केला आहे. कॉंग्रेसने २४ राष्ट्रवादीने २, शेतकरी संघटना ०३, कॉंग्रेस युती ०४, वंचित बहुजन आघाडी ०३, गोंडवाना गणतंत्र पार्टी ०१ तर अपक्ष १० याप्रमाणे ग्राम पंचायत निवडणूकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. अभुतपूर्व विकासकामे व लोक कल्याणकारी उपक्रम या माध्यमातुन चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात सर्व सामान्य जनतेशी राखलेली बांधिलकी व तळागाळातील सामान्य जनतेचे केलेले कल्याण यातुन हा विजय साकारला असल्याचे देवराव भोंगळे यांनी म्हटले आहे. ग्राम पंचायतींच्या विकासासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात येईल, असेही देवराव भोंगळे यांनी म्हटले आहे. या विजयासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांचे आभार त्यांनी व्यक्त केले आहे.