चिंतलधाबा येथे अनोखा शैक्षणिक प्रयोग…!
राजु झाडे
पोंभुरणा तालुक्यातील चिंतलधाबा येथे भारत बाळू नेवारे यांनी “शाळा बंद शिक्षण सूरू” हा अनोखा उपक्रम मागील तिन महिन्यांपासून सुरु केला आहे.
लाकडाऊन च्या काळात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यभरात शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे गावातील शैक्षणिक वर्ग बंद होते. ऑनलाईन शिक्षण गावातील गरीब मुल घेऊ शकत नव्हते. यामूळे चिंतामणी महाविद्यालय पोंभूर्णा येथील विद्यार्थी भारत बाळू नेवारे यांनी जे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्वातून निःशुल्क शिकवणी वर्ग जूलै महिन्यांपासून सुरु करून एक अनोखा प्रयोग केला आहे. या प्रयोगामागील प्रेरणा कालेश्वर नेवारे यांच्यापासून मिळाली. त्यांच्या या प्रयोगाचे गावस्तरावर कौतुक करण्यात येत आहे.