प्रेरणादायी, रितिकाची आंतरराष्ट्रीय गरुडझेप …..!
कोरपना/प्रवीण मेश्राम
परिस्थिती माणसाला घडवीतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही… माणूसच परिस्थिती घडवितो आणि माणूसच परिस्थिती बिघडवितो!
१६ वर्षीय रितिका धुर्वे आदिवासी कन्येची NASA (अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था आहे. मुख्यालय वाशिंग्टन अमेरिका) च्या प्रकल्पात वर्णी…
संपूर्ण भारतातून केवळ 6 विद्यार्थ्यांची निवड
ब्लॅक होल बाबतचे तिचे संशोधन पाहून जगभरातील वैज्ञानिकही थक्क !
रितिकाने ब्लॅक होल संदर्भात केलेल्या अभ्यासपूर्ण संशोधनाने आय.आय.टी. बॉम्बे व सतीश धवन स्पेस सेंटर येथील वैज्ञानिक खूपच प्रभावित झाले आहेत.
अंतराळ संशोधनातील अग्रेसर संस्था नासा व भारतीय अंतराळ संशोधक संस्था (ISRO) च्या संयुक्त विद्यमाने लघुग्रह संशोधनातील अभ्यासाविषयी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोसाइटी फॉर स्पेस एजुकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट तर्फे आयोजित या उपक्रमातून काही विद्यार्थ्यांची नासाच्या शिबिरासाठी निवड करण्यात आली आहे . यामध्ये १६ वर्षीय आदिवासी कन्या रितिका ध्रुव हिची सुद्धा वर्णी लागली आहे.
रितिकाने ब्लॅक होल संदर्भात केलेल्या अभ्यासपूर्ण संशोधनाने आयआयटी बॉम्बे व सतीश धवन स्पेस सेंटर येथील वैज्ञानिक खूपच प्रभावित झाले आहेत. तसेच त्यांनी रितिकाचे संशोधन अत्यंत सखोल असल्याचे म्हंटले आहे.
रितिका ध्रुव ही छत्तीसगढ येथील नयापारा या भागात आपल्या कुटुंबासह राहते. स्वामी आत्मानंद इंग्रजी माध्यमाच्या सरकारी शाळेत ती इयत्ता ११वीचे शिक्षण घेत आहे. नासाच्या प्रकल्पासाठी निवड होताच रितिकाचे कुटुंब व मित्रपरिवाराच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. रितिकाचे वडील हे नयापारा भागात सायकल दुरुस्तीचे एक छोटेखानी दुकान चालवतात.