उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे ब्लड बँक सुविधा उपलब्ध करून देण्याची स्वराज्य आधार फाऊंडेशनची सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांकडे मागणी
राजुरा/चंद्रपूर : जिल्हयात फक्त चंद्रपूर शहरामध्येच ब्लड बैंक ची सुविधा उपलब्ध आहे व जिल्हयाचे क्षेत्रफळ मोठे व जिल्हा हे औदयोगिक क्षेत्र आहे. यामध्ये लोकांची संख्यापण बरीच आहे. जिल्हयातील राजुरा विधानसभेतील राजुरा तालुक्यामध्ये भरपूर कोल माईन्स व सिमेंट कंपन्या आहे आणि प्रदुषण पण ब-याच प्रमाणात वाढलेले आहे त्या कारणाने इथे वेगवेगळे आजार लोकांना होत असून, रस्त्याच्या दुर्दशेमुळे खूप अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहेत त्यामुळे आरोग्याच्या समस्येला घेवून नियमित रूग्णांना रक्ताची खूप गरज पडत असून वारंवार कोरपना, जिवती तालुका तसेच विरूर स्टेशन, व लक्कडकोट येथील लोकांना चंद्रपूरयेथे जाणे शक्य होत नाही. म्हणून ब-याचदा रक्त वेळेवर न मिळाल्याने रक्ताअभावी रुग्ण दगावल्याच्या घटना देखील घडत आहेत. म्हणून मा. श्री. तानाजी सावंत साहेब (सार्वजनीक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री,महाराष्ट्र राज्य) यांना मा.श्री.तहसीलदार साहेब व मा.श्री.आमदार सुभाषभाऊ धोटे साहेब यांचा मार्फत निवेदन देऊन राजुरा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,राजुरा इथे ब्लड बँक ची सुविधा लवकरात उपलब्ध करून देण्यात यावी म्हणून विनंती करून ब्लड बँक ची मागणी स्वराज्य आधार फाउंडेशन, राजुरा च्या वतीने करण्यात आली.