आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक घेत सोडविल्या सिएसटीपीएसमधील कामगारांच्या मागण्या
आमरण उपोषण सुटले, १४ ऑक्टोंबरला प्रकाशीत होणार इलेक्ट्रिक विभागा ची कंत्राट निविदा
आमदार किशोर जोरगेवार यांनी आज हिराई विश्राम गृहात सिएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत विद्युत विभागाची कंत्राट प्रक्रिया तत्काळ पुर्ण करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १४ ऑक्टोंबरला सदर निविदा प्रकाशीत करण्याचे सिएसटीपीएच्या वतीने सांगण्यात आले असुन १७ ऑक्टोंबरला पर्यंत कामगारांना गेट पास दिल्या जाणार आहे. या निर्णया नंतर यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने सुरु असलेले आमरण उपोषण सुटले आहे. या बैठकीला सिएसटीपीएसचे उपमुख्य अभियंता सुहास जाधव, कल्याण अधिकारी आनंद वाघमारे, अधिक्षक अभियंता दत्तात्रय पिंपळे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलन पेंडालात जाऊन सदर उपोषण आंदोलन सोडविले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेड च्या विज कामगार संघटनेचे अध्यक्ष हेरमन जोसेफ, उपाध्यक्ष प्रकाश पडाल, कार्याध्यक्ष नितिन कार्लेकर, अतुल बोढे, देवानंद गोलटकर, विक्की देवगळे, अशोक ठाकरे, सुरेश ठाकरे, प्रविन झाडे, महेश मोडमवार, मुकंदा ठाकरे यांच्यासह इतर कामगारांची उपस्थिती होती.
चंद्रपूर महाओष्णीक विद्युत केंद्रातील इलेक्ट्रीक विभागाचा कंत्राट कालावधी ३१ मे २०२२ रोजी संपलेला होता. त्यानंतर पुन्हा निविदा प्रकाशित करून काम नियमित सुरु ठेवणे अपेक्षित होते. मात्र असे न करता अतिरिक्त मुदत वाढ करून काम सुरु करण्यात आले. काही दिवस हा प्रकार चालला नंतर सर्व कंत्राटी कामगारांना कुठलीही पुर्व सुचना न देता कामावरून कमी करण्यात आले. त्यामुळे या विरोधात यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. यावेळी संबधित अधिका-र्यांनी उपोषण पेंडालाला भेट देत कामगारांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र नंतर सिएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांनी कामावर घेऊ मात्र कोणतेही भत्ते लागु होणार नाही अशी भुमिका घेतली. हा निर्णय कामगारांवर अन्याय करणारा असल्याचे सांगत पुन्हा काल शुक्रवार पासुन यंग चांदा ब्रिगेडच्या विज कामगार संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते.
याची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी कामगारांच्या मागण्यांसाठी सिएसटीपीएसच्या अधिकाऱ्यांची आज शनिवारी बैठक बोलावली होती. या बैठकीत सदर निविदा प्रक्रिया तात्काळ पुर्ण करुन कामगारांना कामावर घेण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी संबधित अधिका-र्यांना दिले. त्यानंतर आता १४ ऑक्टोंबरला सदर निविदा प्रकाशीत केल्या जाणार असुन १७ ऑक्टोंबर पर्यंत सर्व कामगारांना सिएसटीपीएसच्या वतीने गेट पास उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. कामगारांना अपेक्षीत असा हा निर्णय असल्याने त्यांच्या वतीने सुरु असलेले उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वता उपोषण पेंडालाला भेट देत कामगारांचे उपोषण सोडविले आहे.