अखेर शिंदेंनी शिवसेनेचा खून केला…
अहमदनगर(संगमनेर)
ज्ञानेश्वर गायकर पाटील
नुकतीच बातमी धडकली की शिवसेनेचे निवडणूक चिंन्ह , “धनुष्य बाण” अपेक्षेप्रमाणे दिल्लीत निवडणूक आयोगाने गोठवले आहे. बातमी वाईट तर आहेच पण भारतीय लोकशाही सध्या कुठल्या उंबरठ्यावर उभी आहे , याचे ही अवलोकन होत आहे. वास्तविक पाहता असे निर्णय कधी घडत नाहीत ,पण सर्व स्वायत्त संस्था कुणाच्या इशाऱ्यावर सध्या काम करतात याची जाणीव संपूर्ण देशाला झाली ही असेल. भाजप ने या बद्दल हत्तीवरून मिरवणूक काढून देशात साखर वाटावी, अन् लोकशाही चे कसे संरक्षण कसे आम्ही करत आहोत याचा टोहो फुडून ,रंगा बिल्ला झिंदाबाद नारा करत मिरवणूक काढावी. यात खरा निर्देशक , संगीतकार, कथा, नृत्य निर्देशक हा कोण आहे हे जनता समजत आहे.
आज महाराष्ट्राच्या मनातील व इतिहासातील सर्वात कलंकित घटना आहे. न्याय, निवडणूक आयोग. केंद्रीय तपास यंत्रणा या वर सर्व सामान्य जनता किती विश्वास भविष्यात ठेवील हे सांगणं आता फार अवघड नाही. देशात मग्रुळी व अराजकता फैलावत आहे याची नांदी चालू आहे.
वास्तविक शिंदे यांनी शिवसेना मधून फुटून एक गट निर्माण केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कबुली दिली की ,आम्ही महा विकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रथम पासून प्रयत्न करत होतो.कोण कसे गळाला लागेल याची चाचपणी घेत होतो. शिंदे गटाचा एक महाभाग आमदार तर म्हणाला , की आम्हाला न्यायलय, वैगरे काही भीती नाही, पुढील अडीच वर्षे आम्हीच राज्य करणार. या सर्व बाबींचा मिथित अर्थ घेतला तर सत्य भयानक आहे. सत्ता मिळवण्या करिता काही ही, अन् चक्क तो लोकशाहीचा खून ही असू शकतो अन् हा खून शिंदे तुम्ही केलात.
शिवसेनेचे निवडणूक चिन्न् धनुष्य बाण आहे, ते जनमानसाचा हृदयात कोरले आहे. उद्या ते नसेल. अन्य चिन्ह असेल, शिंदे तलवार चिन्ह घेतली, तसे चिन्ह ते मागतील कारण मेळाव्यात त्यांनी तलवार पुंजली होती.ते चिन्ह त्यांनी मागितले अन् मिळवले तर नक्कीच संशय रूढ होतो की सगळी मॅच फिक्स आहे. कायदा फक्त अन् फक्त तुम्हाला व मला म्हणजेच गोर गरीब नागरिक यांना आहे.न्याय व्यवस्थेवर उद्या आम् जनतेचे प्रश्न चिन्ह असणार आहे.
निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे, हे म्हणणे धाडसाचे ठरेल. चिन्ह गोठवणे म्हणजे चिंधी फाडण इतकं सोपं नाही. काल निवडणूक आयोगाने एक स्वतःची प्रणाली आणली, यात प्रामुख्याने अरविंद केजरीवाल यांना चाप दिला आहे. पण ह्या सर्व गवगुंड्या आहेत. लोक आता हुशार झालेत. निवडणूक आयोग, केंद्रीय तपास यंत्रणा यांनी जाहीर करून टाकावे की आमची स्वायत्तता आता खूप विकसित झाली असून आमचे मेंदू आमचेच आहेत म्हणून आम्ही काम करत आहोत.
राज्यात विरोधी पक्ष नेते खोट्या नात्या आरोप करून तपासाच्या नावाखाली अटकेत आहेत.. दोन वर्षे त्यांना जामीन होत नाही.भाजप मध्ये गेलात तर क्लिनचीट मिळते. हे सूत्र हातात घालून, अन् डोक्यात घालून शिंदे सुरत ला पळाले. हा इतिहास ताजा आहे. याची फिल्डींग खूप दिवस चालली होती, हे चंद्रकांत पाटील यांनी कबूल केलं आहे. यात मोठ प्लॅनिंग झालं आहे. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल याची अपेक्षा राहिली नाही. आता मायबाप सरकार हेच सर्वस्व भाजप सोडून असणार. शिवसेना नाव सुद्धा वापरता येणार नाही. आज स्वर्गात बाळासाहेब ठाकरे साहेब खाली मान घालून धाय मोकळून रडत असतील, बाजूला मीनाताई ठाकरे असतील, म्हणत असतील देवा मला अजून पाच दहा वर्षे वाढवून का दिले नाही. हे पाप करणारे शिंदे आहेत, याचे खूप दुःख त्यांना झाले असेल. अखेर काही असो, “शिंदे तुम्ही शिवसेनेचा खून केलाय” इतकं नक्की….
ज्ञानेश्वर गायकर पाटील
dmgaykar@gmail.com