सुशिक्षीत बेरोजगारांनो कोणाच्याही धमक्याना भिक घालु नका, आपल्या अधिकारातील कामे मिळविणे आपल्या अधिकार आहे – इंजि. पंकज गुप्ता यांचे आवाहन
सुशिक्षित बेरोजगारांची कामे कमिशनच्या प्रलोभनानी ओढून नेत्यांचा स्वीय सहाय्यकांची पोलीस तक्रार करा, संघटना खंभीरपणे आपल्या पाठीशी आहे.
चंद्रपूर जिल्हयात काही तथाकथीत नेते व जनप्रतिनिधींचे स्वीय सहाय्यकांनी आपल्या आपल्या नेत्यांच्या नावाने अधिकाऱ्यांवर प्रभाव टाकून आमदार निधी, ग्रामविकास निधी, खनिज निधीच्या कामात सुशिक्षीत बेरोजगारांनी निवीदा टाकु नये. टाकल्यास त्यांना काम करू देणार नाही कामामध्ये अडचणी आणने, काम उत्कृष्ठ असले तरी निकृष्ठ म्हणून त्रस्त करणे, कामाचे ले-आउट मिळु ने देणे व भुमिपुजनाच्या नावाने प्रकरणे रेंगाळत ठेवणे या विविध षडयंत्राच्या दबावाखाली चाललेला प्रकार गैरकायदेशिर व निंदणीय असून यांच्या प्रभावास बळी पडणाऱ्या अधिकाऱ्यांनी सुध्दा सावध राहावे अन्यथा आझाद सुशिक्षीत बेरोजगार संघटनेद्वारा तिव्र आंदोलन त्या अधिकाऱ्यांच्या कार्यालय व घरापुढे करतील, असे जाहीर केले असून महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी व विविध पक्षाच्या नेत्यांनी आपल्या-आपल्या या प्रकाराच्या वापर करणाऱ्या आमदार, त्यांचे स्विय सहायक व सांगकामे यांना आवार घालावा.
अन्यथा अन्याय सहन करून करून त्रस्त झालेल्या युवकांची तळपायाची आग मस्तकाला गेल्यास त्यांच्या पोटाची भुक व त्यांनी मिळविलेल्या डिग्रीसाठी केलेला खर्च पाहता होणारे परिणाम भोगण्यासाठी संबंधितांनी तयार असावे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या परिणामास संबंधीत मंडळी व या विषयाकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन जबाबदार राहिल, असे जाहीर करून सर्व सुशिक्षीत बेरोजगारांना निर्भय होवून स्पर्धा करा. कुणी आपणास त्रास देत असेल तर त्वरीत संघटनेशी संकर्प साधावा, हि संघटना समर्थपणे सदैव तुमच्या पाठीशी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता उभी राहील. अशा आशयाचे पत्रक आझाद सुशिक्षीत बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष इंजि. पंकज गुप्ता यांनी माध्यमांकडे प्रेषीत केले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विविध पक्षांचे प्रदेशाध्यक्ष व गुप्तचार संघटनांना तक्रार प्रेषीत केली आहे.