घुग्घूस येथील गोंडवाना गोटूल मध्ये राजा रावण महापूजा उत्साहात साजरी
आदिवासी समाज बांधवा मार्फत महात्मा राजा रावण महापूजा गोंडवाना गोटूल मध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ठाणेदार बबन पूसाठे होते. त्यांनी सर्वधर्मसमभाव म्हणून रावण महापूजेसाठी उपस्थित राहून आदिवासी समाजांना मार्गदर्शन केले.
आदिवासी गोंड समाज हा राजा रावणाला आपले पूर्वज, कुलदैवत माणतात. न्यायप्रिय, विवेकवादी, राजनीतिक तज्ञ्, दृरष्टीकोन असलेला, चार्य शिस्तप्रिय व न्यायप्रिय महात्मा राजा रावणला माणतात यामुळे येथील आदिवासी समाज बांधव एकत्र येऊन गोंडवाना गोटून मध्ये राजा रावणाची पूजा करण्यात आली.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक मंदेश्वर पेंदोर, केशव टेकाम, देविदास किवे, गणेश उईके,गणेश किंनाके, दीपक पेंदोर, विकास मेश्राम , राकेश तिरणकर, शैलेश सलामे, लतीश आत्राम, कवडू मडावी ,विठ्ठल कुमरे, अंकुश उईके, कुणाल टेकाम, अरविंद कीवे, संदीप तोडासे, विजय आत्राम, संदीप आत्राम, नितेश सिडाम, नरेश येटे, राजेश येटे, संदीप कोयचाडे, अनिल सोयाम, गजू फाये, सुनील सोयाम, गोलू, गुलाब नैताम, गुरु गेडाम, रमेश गेडाम, स्वप्नील गेडाम, पुष्पा टेकाम, अनिता कोडापे, मोनिका येटे, ललिता येटे, भाग्रताबई सिडाम, बेबीताई कींनाके, शांताबाई उइके, कल्पना कोडापे, चंदा कोयचाडे, सुनीता आत्राम, अश्विनी धूर्वे, कविता कडपते, मनीषा गेडाम, मंदा मेश्राम, नानेबाई मेश्राम, सुमन मेश्राम, रेखा आत्राम, सुधा उइके, शारदा सलामे, सुषमा ऊइके, सईबाई मडावी व सर्व आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.