राजुरा पोलिसांनी अट्टल चोरट्यास घेतले ताब्यात
पाच गुन्ह्याची कबुलीसह एक लक्ष अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल घेतला ताब्यात
राजुरा : राजुरा पोलिसांनी चोरट्यांना अटक केली असता तपासा दरम्यान त्यांनी पाच चोऱ्या राजुरा हद्दीत केल्याची कबुली दिली. चोरट्यांकडून पोलिसांनी एक लक्ष अठरा हजार रूपायांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सविस्तर वृत्त असे की, रामपूर येथील रहिवासी असलेल्या महिलेला पिण्याचे पाणी मागून ती पाणी आणण्यास मागे फिरली असता गळ्यातील मंगळसूत्र बळजबरीने लंपास करून चोरट्याने घटनास्थळावरून पळ काढला. सदर घटनेची माहिती महिलेने राजुरा पोलिसांना दिली. याआधारे पोलिसांनी सोमनाथपुरा वॉर्ड येथील आरोपी उत्तम दत्तूजी चौधरी (42) यास ताब्यात घेतले. तपासा दरम्यान त्याने पाच गुन्ह्याची कबुली दिली. यात सोन्याचे तीन डोरले (मंगळसूत्र), सोन्याचे 27 मणी, सोन्याची 55 हजार रुपयांची चेन, हिरो कंपनीची पॅशन प्रो मोटर सायकल (एम एच 34 ए क्यू 5727) असा अंदाजित किंमत एक लक्ष अठरा हजार रुपयेचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे. बल्लारपूर येथील राज वर्मा यांच्यासह दोन आरोपीला अटक करून त्यांच्याकडून तांबे हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
सदरची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार (सपोनि) संतोष दरेकर, पोलिस उपनिरीक्षक सदानंद वडतकर, सपोउनि. खुशाल टेकाम, पोहवा. रवींद्र नकनवार, पोहवा. किशोर तुमराम, पोहवा. विनायक कुडमेथे, नापोशी. संदीप बुरडकर, पोशी. महेश बोलगोडवर, रामाराव भिंगेवाड, रवींद्र तुरणकर यांनी पार पाडली.