श्री. म. द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात पालक संवाद सभेचे आयोजन

0
594

श्री. म. द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात पालक संवाद – सभेचे आयोजन

दत्त प्रासादिक शिक्षण प्रसारक मंडळ आर्णी द्वारा संचालित श्री म. द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालयात “पालक संवाद -२०२२” चे आयोजन करण्यात आले आहे. यात अकरावी व बारावीच्या, सर्व कला व वाणिज्य शाखेच्या जवळपास 120 पालकांचा सहभाग होता. यावेळी मंचावर संस्थेचे सचिव, ऍड. सिध्दार्थ संजय भारती साहेब अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थेच्या संचालिका सौ आशाताई प्रियदर्शन भारती मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रा. डॉ शशिकांत वानखेडे सर, कन्या शाळेचे प्राचार्य श्री रविशेखर कोटावार सर, मुख्य शाखेचे प्राचार्य श्री अमोल जगताप सर, उपमुख्याध्यापक श्री दिलीप ननावरे सर पर्यवेक्षक श्री प्रेमकुमार नळे सर, वसतिगृह अधीक्षक श्री पुरुषोत्तम इंगोले सर आणि शिक्षक बंधू – भगिनी उपस्थित होते. स्मार्ट बोर्ड द्वारे “डिजिटल एज्युकेशन” आपण मुलांना देणार आहोत, याची संपूर्ण आणि अभ्यासपूर्ण माहिती माननीय Adv. सिद्धार्थ भारती साहेबांनी उपस्थित पालकांना दिली. पालकांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन भविष्यात आपल्या पाल्यांना कॉन्व्हेन्ट चे धर्तीवर पाचवी ते बारावी पर्यंत डिजिटल एज्युकेशन पुरवू ही ग्वाही दिली. या संवाद सभेत पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी प्रा. सुभाष जाधव सर यांनी इंग्रजी विषयाचे तर प्रा. मनोज सहारे सरांनी इतिहास विषयाचे डिजिटल बोर्डाच्या माध्यमातून प्रात्यक्षिक करून दाखवले. या पालक संवाद सभेचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. मनोज सहारे सर यांनी केले. पालकांचे आणि मान्यवरांचे आभार सुध्दा श्री सहारे सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here