बल्लारपूर तहसील कार्यालयात पार पडला “सेवा पंधरवडा” कार्यक्रम

0
639

बल्लारपूर तहसील कार्यालयात पार पडला “सेवा पंधरवडा” कार्यक्रम

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे व एसडीओ डॉ. दिप्ती पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. कांचन जगताप यांनी केला शेकडो अर्जांचा निपटारा

 

 

बल्लारपूर (चंद्रपूर), विशेष प्रतिनिधी : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे तसेच बल्हारपूरच्या उपविभागीय अधिकारी डॉ. दिप्ती सुर्यवंशी-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार डॉ. कांचन जगताप यांनी नुकत्याच पार पडलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रमात शेकडों अर्जांचा निपटारा केला आहे.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा हा कार्यक्रम दि. १७ सप्टेंबर पासून ते दि.२ ऑक्टोंबर पर्यंत बल्हारपूर तहसील कार्यालयाच्या वतीने राबविण्यात आला असुन या कार्यक्रमा अंतर्गत एकुण २८६अर्जांचा तातडीने निपटारा करण्यात आला.बल्हापूरच्या तहसीलदार डॉ. कांचन जगताप यांनी या कार्यक्रमात स्वतः पुढाकार घेतला होता. सर्वसामान्य जनतेची कामे उपरोक्त कालावधीत पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनातून तहसील कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण तक्रारी अर्जांचा निपटारा करण्याकरिता शासनाचे निर्देशानुसार (दि. १७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत) सदर सेवा पंधरवडा कार्यक्रम घेण्यात आला.

उपरोक्त सेवा पंधरवडा कार्यक्रमात अर्जांचा निपटारा करण्यासाठी बल्हारपूरच्या तहसीलदार डॉ. जगताप यांना नायब तहसीलदार सतीश साळवे, नायब तहसीलदार महेंद्र फुलझले नायब तहसीलदार शेंडे, नायब तहसीलदार तेलंग, सुनील तुंगीडवार, गजानन उपरे, दीपक वडूळे, अजय गाडगे, चंदू आगलावे, महेंद्र कन्नाके, प्रमोद अडबाले, अजय नावकरकर, निकिता रामटेके ,सचिन पुणेकर , स्मिता डांगरे श्रीमती बरचांने, दीपक वडूळे गजानन उपरे, मंडळ अधिकारी शंकर खोब्रागडे, पटवारी शंकर खरुले, अजय नौकरकर, महादेव कन्नाके, महिला तलाठी कोडापे या शिवाय अन्य कर्मचारी वर्गांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विशेष उल्लेखनीय बाब अशी कि वरील सेवा पंधरवडा कार्यक्रमात एक ही प्रलंबित अर्ज शिल्लक राहिला नव्हता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here