जागृत शारदा महिला मंडळ यशवंत नगरतर्फे “मी सावित्री बोलतेय” शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनात्मक पथनाट्याचे सादरीकरण

0
642

जागृत शारदा महिला मंडळ यशवंत नगरतर्फे “मी सावित्री बोलतेय” शैक्षणिक व सामाजिक प्रबोधनात्मक पथनाट्याचे सादरीकरण

 

प्रवीण मेश्राम
कोरपना : महिला शिक्षणाच्या जननी क्रांतिज्योती माई सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाचे दारे उघडे करून स्वावलंबी बनविले आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे महिला शिक्षणात योगदान या विषयावर जागृत शारदा महिला मंडळ यशवंत नगरतर्फे उत्कृष्ट पथनाट्य सादर करण्यात आले. सर्व महिला कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल परीक्षण समिती ने अभिनंदन केले.

कार्यक्रमाला यशवंत नगर तथा इंदिरानगर येथील महिला -पुरुष तथा बालकांची लक्षणीय उपस्थिती होती. जागृत शारदा महिला मंडळ तर्फे सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या जीवनावरील पथनाट्ययात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

यावेळी प्रा. विजय आकनूरवर, प्रा. डॉ. शरद बेलोरकर, सामाजिक कार्यकर्ते उद्धव पुरी, नगरसेवक विक्रम येरणे, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, संतोष महाडोळे , रुपेश चूधरी, अतुल गोरे, आकाश वराटे, नगरसेविका जयश्री ताकसांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here