!!त्या!! चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या काकावर तातडीने कारवाई करा! गाेंडपिपरी यंग ब्रिगेडची मागणी!

0
577

!!त्या!! चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या काकावर तातडीने कारवाई करा! गाेंडपिपरी यंग ब्रिगेडची मागणी! गाेंडपिंपरी 🔷किरण घाटे🟣
🌼देशभरात सद्या महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.नुकतेच उत्तरप्रदेशातील हाथरस मधील घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र तिव्र प्रतिसाद उमटत असतांनाच चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्या अंतर्गत येणा-या येनबोथला येथे माणूसकीला काळीमा फासणारी घटना नुकतीच घडली.काकानेच आपल्या स्वताच्या अवघ्या १२ वर्षीय पुतणीवर अत्याचार केला.यापूर्वी सुद्धा त्याने आपले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला हाेता. ही बाब जर तु सांगितली तर तुला जीवे मारु अशी धमकी देखिल त्याने तिला दिली हाेती भितीपोटी मुलीने घरच्यांना हे सांगितले नाही.मात्र मुलीवरती झालेला हा अत्याचार पाहून नंतर मुलीच्या वडिलांनी गोंडपिपरी पाेलिस स्टेशन गाठुण पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे.या संपुर्ण प्रकरणाची सखाेल चौकशी करुन दोषीवर तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी यंग ब्रिगेडने एका निवेदनातुन केली आहे.तसेच या संदर्भात पाेलिस निरीक्षक संदिप धोबे यांच्या मार्फतीने जिल्हा पोलिस अधिक्षक चंद्रपूर यांना निवेदन पाठविले. सदरहु निवेदन देते वेळी गोंडपिपरी यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुरज माडुरवार,तालुका उपाध्यक्ष अमित भोयर,तारसा बुज.चे शाखाध्यक्ष निकेश बोरकुटे,धाब्याचे सामाजिक कार्यकर्ता आशिष मुंजनकर,घडोली शाखाध्यक्ष केतन भोयर,नबात सोनटक्के,राहुल मेकर्तीवार,शुभम भोयर आदिं उपस्थित हाेते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here