बल्लारपूर शहरात “बतकम्मा” उत्सव साजरा
तेलुगु वारी फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व तेलुगू लोकांना एकत्र करण्याचा उपक्रम यशस्वी झाला “दुसरे वर्ष”
तालुका प्रतिनिधी/रोहन कळसकर
बल्लारपूर : सोमवार दिनांक 03 ऑक्टोबर 2022 रोजी गणपती वॉर्ड, मंगलमूर्ती लॉन मध्ये “बतकम्मा महाऊत्सव” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बल्लारपूर शहरातील शेकडो तेलुगू भाषिक कुटुंबांनी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला सहभाग दर्शविला. तेलुगु वारी फाउंडेशन तर्फे बेस्ट बतकम्मा, बेस्ट ट्रेडिशन लेडी, सर्वोत्कृष्ट पारंपारिक गायन आणि सर्वोत्कृष्ट नृत्याचा पुरस्कार 17 महिलांना देण्यात आले. शहरातील अनेक तेलुगू परिवारांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन शहर पोलीस निरीक्षक उमेश पाटील जी यांचे हस्ते झाले, मंचावर कार्यक्रमाचे आयोजक रविकुमार पुप्पलवार, बालाजी ट्रस्टचे सचिव डॉ. श्रीनिवास तोटा, प्रा. गंडलेवार, ऍड. राजेश सिंग होते, कार्यक्रमाचे संचालन ईनाडू पत्रिकाचे संपादक श्रीनिवासन उन्नाव जी यांनी केले.
कार्यक्रमाला सफल करण्यासाठी आनंद महाकाली, राजकुमार जुट्टू, उमेश कोल्लावार जी, सुधीर कालेपल्ली जी, आदर्श नारायणदास जी, व्यंकटेश बालाबैरैया, सतीश नंदाराम, नारायण चुक्का, श्रीनिवासन पिसार, अनिल मारशेटीवार, अशोक चेनूरवार, सिनू कोनडावार, संजय मुपिळवार रामेश्वर नातरगी, लक्ष्मणराव सर, मोहन मनपत्तिवार आदींचे सहकार्य लाभले.