रस्ता दुरुस्तीचा मागणीसाठी नागरिकांचा चक्का जाम
महिला सरपंचासह, विद्यार्थी व गावाकऱ्यांनी तब्बल पाच तास वाहतूक रोखुन धरली
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
नांदाफाटा : सतत पडत असलेला पाऊसाने नागरिक आधीच हैराण त्यातच सर्वत्र रस्त्याची दुरावस्था असल्याचे चित्र कोरपणा तालुक्यात दिसत आहे. भोयेगाव ते गडचांदूर रस्त्याचे काम सुरु असल्याने मागील तीन महिन्यापासुन त्या मार्गवरुन गडचांदूर कडे जाणाऱ्या अवजड वाहनाना आवाळपूर मार्गे वळवीन्यात आले. परिणामता सांगोडा ते बिबी पर्यंत रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. यामुळे रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला असून याच मार्गावरील आवाळपूर येथे रस्त्यावर दोन ते तीन फूट खोल असा भला मोठा खड्डा पडला. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहणाना त्यातून मार्ग काढणे कठीण झाले. मागील महिनाभरापूर्वी आवाळपूर ग्रामपंचायतीचा वतीने बांधकाम विभागाला लेखी निवेदन देण्यात आले. मात्र त्यावर कुठलीही कारवाही झाली नाही. या दरम्यान अनेक छोटे मोठे अपघात या खड्यामुळे झाले. त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायत उपसरपंच बाळकृष्ण काकडे यांनी बांधकाम विभागला निवेदन दिले मात्र यावेळीही संबंधित विभागाकडून उडवाउडवीची उत्तरे दिल्या गेली. आज सकाळी दोन शालेय विद्यार्थी दुचाकीने ने जातं असताना त्या खड्यात पडले. यामुळे संतप्त नागरिकांनी सकाळी 8 वाजता पासून रस्ता रोखून धरला. बघता बघता शेकडो गावकरी आंदोलनात सहभागी झाले. परिणामता गावाच्या महिला सरपंचा प्रियांका दिवे व उपसरपंच बाळकृष्ण काकडे, कल्पतरू कन्नाके, नितीन शेंडे यांच्या नेतृत्वात गावाकऱ्यांनी, शाळकरी विद्यार्थी यांनी तब्बल पाच तास रस्ता रोकून धरत रस्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली. यामुळे रस्त्याचा दुतर्फा तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. बांधकाम विभागाला संपर्क करत जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतल्या जाणार नाही असा पवित्रा संतप्त नागरिकांनी घेतल्यामुळे वातावरण चांगलेच चिघळले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याचे चिन्हे दिसत असताना पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने उपनिरीक्षक प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वात, माने मेजर, संदीप अडकीने यांच्या कडून गावाकऱ्यांना आश्वस्त करत रस्त्याचा दुरुस्ती करिता कामाला सुरवात करण्यात आली. कामाला सुरुवात झाल्या नंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. भविष्यात बिबी आवाळपूर सांगोडा रस्त्याची योग्य दुरुस्ती न केल्यास यापेक्षा ही मोठे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला.
या वेळी आवाळपुर येथील महिला सरपंचा प्रियंका दिवे,उपसरपंच बाळकृष्ण काकडे, सुरेश दिवे, कल्पतरू कन्नाके, नितेश शेंडे,सुरेश जिवणे, लटारी ताजणे, गजानन डाखरे, अनंता निब्रड,भाविक उमरे, प्रदीप सुर, प्रदीप मडावी, उसेन मुरके,स्वप्नील मुंगुल,रवी ताजणे, प्रकाश उमरे, मंगेश सोयाम, महेश कोंडेकर, अक्षय माणूसमारे, सोबतच गावातील अनेक नागरिक, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
“बिबी आवाळपूर सांगोडा रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली असून दुचाकीने प्रवास करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे वेळीच या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
बाळकृष्ण काकडे, उपसरपंच ग्रा.प आवाळपूर
“येत्या काही दिवसात भायेगाव गडचांदूर रस्ता सुरु होणार असून आवाळपूर मार्गे होणाऱ्या वाहतुचा ताण कमी होईल. रस्त्याचा कामाला आजच सुरुवात करायचे आदेश देण्यात आले आहे.”
आकाश बाजारे, उप विभागीय अभियंता, सा. बां. विभाग गडचांदुर