सावित्रीबाई फुले महाविद्यालयाचे प्रा. जहीर सैय्यद यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
कोरपना/प्रवीण मेश्राम
गडचांदुर : जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे दरवर्षी कोरपणा, जिवती व राजुरा तालुक्यातील विवीध शिक्षण क्षेत्रात क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. यावर्षी वरील तिन्ही तालुक्यातील एकूण 22 शिक्षकांना हा पुरस्कार घोषित झाला. कनिष्ठ महाविद्यालय विभागातून सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक जहीर सैय्यद यांना हा पुरस्कार दिला गेला.
प्रा जहीर सैय्यद सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात मागील 22 वर्षापासून कार्यरत असून दरवर्षी व सुट्टीच्या दिवशी ते मुलांकरिता इंग्रजी बेसिक ग्रामरचे मोफत अतिरिक्त वर्ग घेतात त्यांच्या मार्गदर्शनातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी विवीध क्षेत्रात यश संपादन केले आहे. तसेच ते “जहीर व्हॉईस” (Jahir Voice) या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारे व्हिडिओ बनवतात. शैक्षणीक कार्यासोबतच प्रा जहीर सैय्यद हे सामाजिक कार्यात सुध्दा अग्रेसर असतात.
प्रा जहीर सैय्यद यांच्या शैक्षणिक, सामजिक कार्याची दखल घेऊन जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे त्यांना या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार दिला गेला.
झोनल प्रेसिडेंट सौरभ बरडिया, जेसीआय अनूप गांधी, रजनी ताई हजारे, स्वतंत्रकुमार शुक्ला तसेच जेसीआय राजुरा रॉयल्स चे समस्त पदाधिकारी या मान्यवरांच्या उपस्थितीत बल्लारशाह विश्राम गृहात पार पाडलेल्या दिमाखदार सोहळ्यात सर्व 22 शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला.