जोरगेवार हा जमिनीशी जुळलेला परिवार – अभिलिप्सा पांडा
अम्मा का टिफिन उपक्रमाचे केले कौतुक
कार्यक्रमानिमित्ताने देशातील अनेक भागात जाण्याच्या योग आला. या दरम्यान अेनकांच्या भेटी गाठी होत असतात मात्र आपल्या भागातील लोकांना आपला परिवार समजून गरजू लोकांच्या जेवणाची रोज व्यवस्था करणारे किंचितच असते. आज आमदार जोरगेवार यांच्या परिवाराची भेट घेतली. त्यांच्या अम्मा का टिफिन या उपक्रमाबाबत माहिती मिळाली. जोरगेवार हा जमिनीशी जुळलेला परिवार असुन अन्नदानासारखे पुण्याचे काम करत असलेल्या या कुटुंबावर माता महाकालीची सदैव कृपा राहिल. अशी भावना हर हर शभु गाण्याची सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पांडा यांनी व्यक्त केली.
महाकाली महोत्सवाचा आज दुसरा दिवस असुन आज शहरातुन माता महाकालीची भव्य नगर प्रदक्षिणा यात्रा निघणार आहे. यात हर हर शंभु गाण्याची सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पांडा रोड शो करणार आहे. त्यासाठी आज दुपारी त्या चंद्रपूरात दाखल झाल्या. यावेळी महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी अभिलिप्सा पांडा यांनी जोरगेवार कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शाल व श्रीफळ देउुन जोरगेवार परिवाराने अभिलिप्सा पांडा यांचे स्वागत केले. यावेळी अभिलिप्सा यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या तर्फे सुरु असलेल्या अम्मा का टिफीन या उपक्रमाची माहिती जाणुन घेत अम्मांचा आर्शिवाद घेतला. चंद्रपूरात प्रथमच आयोजित हा महोत्सव भव्य असुन राज्यभरात आयोजनाची चर्चा होत आहे. चंद्रपूरात दाखल होताच माता महाकाली मातेच्या गाण्यांचा आवाज कानावर आला. एखाद्या मोठ्या धार्मीक स्थळी आपण प्रवेश केला असे यातुन जाणवले. हे आयोजन चंद्रपूरातील धार्मीक महत्व नक्कीच वाढवेल असा विश्वास यावेळी अभिलिप्सा पांडा यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, अम्मा म्हणजेच गंगुबाई जोरगेवार, कल्याणी जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, रंजिता जोरगेवार, प्रसाद जोरगेवार यांच्यासह जोरगेवार परिवारातील सदस्य आणि माता महाकाली सेवा समितीच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.