येत्या १ऑक्टोंबरला करतेय व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटी एक वर्ष पूर्ण!
चंद्रपूर- ◼️विशेष प्रतिनिधी◼️– चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून ओळख असणाऱ्या भद्रावती शहरातील व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीला येत्या १ ऑक्टोंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. या सोसायटी मार्फत दिव्यांगांना वेळोवेळी त्यांचे कामात मदत करणे ,महिलांच्या तक्रारींचे निराकरण करणे, ग्रामीण भागात आरोग्य शिबीर आयोजित करणे आदीं उपक्रम राबविल्या जात आहे. सदरहु सोसायटीच्या संस्थापिका कु.किरण विजय साळवी ह्या असून त्या नेहमीच तालूक्यातीलू सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. व्हर्चूअस मल्टीपर्पज सोसायटीत कलावती अमोल कोडापे, गितेश्री सातपुते, अनिता यशवंत कुमरे , कु. रागिणी अशोक थुल, भारती मंगेश शिडाम ह्या गेल्या काही दिवसांपासून कार्यरत आहेत.दरम्यान भद्रावती नगरीच्या मुख्य मार्गावर असलेल्या (झिंगुजी मठा समिप असणा-या) या सोसायटीला आज पावेतो अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवर मंडळींनी भेटी देवून संस्थापिका कु. किरण विजय साळवी यांच्या व्हर्चुअस मल्टीपर्पज सोसायटीच्या कार्याची मुक्त कंठाने स्तुती केली आहे.नुकतेच भद्रावती तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात येणा-या विलोडा येथे एक आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते त्या शिबिराला जनतेंनी उत्स्फुर्तंपणे प्रतिसाद दिला असल्याचे कु. किरण विजय साळवी यांनी या प्रतिनिधीशी बोलताना काल चंद्रपूर मुक्कामी सांगितले. भविष्यात याच सोसायटी मार्फत तालुक्यातील ग्रामीण भागात एकादे भव्य वैद्यकीय शिबीर आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचे कु.किरण विजय साळवी यांनी बोलून दाखविले . सध्या तरी ही सोसायटी प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे हे तेव्हढेच खरे आहे.