महिला व युवतींच्या कला गुणांना प्रोत्साहन देणारे सहजं सुचलं व्यासपीठ – डॉ.स्मिता मेहेत्रे
चंद्रपूर ◼️ विशेष प्रतिनिधी ◼️महिला व तरुणींच्या कला गुणांना वाव देणारे महाराष्ट्रातील नामवंत सहजं सुचलं हे एकमेव व्यासपीठ असल्याची प्रतिक्रिया उपराजधानी नागपूरच्या जेष्ठ साहित्यिका डॉ.स्मिता मेहेत्रे यांनी आज सोमवारला सकाळी या प्रतिनिधीशी (भ्रमनध्वनीवरून) बोलताना दिली.या गृप वर निव्वळ चंद्रपूर गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यातीलच महिला व तरुणीं नाही नव्हे तर राज्यातील अनेक नामवंत महिला साहित्यिक, मेकअप आर्टिस्ट, शैक्षणिक, सामाजिक व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणांऱ्या कलावंत व महिला जुळल्या असल्याचे त्या म्हणाल्या.गत आठ वर्षांपूर्वी (वर्धा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोडत असलेल्या) वरुड या एका छोट्या गावी वास्तव्य करणारी व अभियंता असलेली कु. रितू लोहकरे यांचे संकल्पनेतून या व्यासपीठाची निर्मीती करण्यांत आली आहे.बघता बघता आजच्या घडीला या गृपवर १९००पेक्षा अधिक महिलां व तरुणी ह्या या गृपच्या सदस्या झाल्या आहे. हे थोडे थोडके नव्हे! सदरहु व्यासपीठ अल्प कालावधीत नांवरुपास आले असुन खरोखरचं यातील काही जेष्ठ सदस्या नवोदित तरुणींसाठी प्रेरणादायी ठरल्या आहे.सहजं सुचलं महिला व्यासपीठाच्या मुख्य मार्गदर्शिका उपराजधानी नागपूरच्या मायाताई कोसरे , व राजूराच्या जेष्ठ साहित्यिका मेघा धोटे ह्या आहेत. उपरोक्त व्यासपीठावरील अनेक नवोदित सदस्यांनी कला व साहित्य क्षेत्रात अनेक पुरस्कार प्राप्त केले हे येथे उल्लेखनीय आहे.विशेषता राज्यातील जागतीक पुरस्कार विजेती कवयित्री कु.अर्चना सुतार , पुण्याच्या स्नेहा मडावी, वणीच्या विजया तत्वादी, क्रीडापटू कु.सायली टोपकर ,पथ्रोडच्या जेष्ठ साहित्यिका विजया भांगे , मूलच्या सुपरिचित कवयित्री स्मिता बांडगे ,चिमूरच्या कवयित्री वर्षा शेंडे,या शिवाय सामाजिक कार्यकर्त्या नागपूरच्या नयना झाडे ,चंद्रपूरच्या वंदना हातगांवकर छबूताई वैरागडे, चंदा वैरागडे, भद्रावतीच्या किरण साळवी , रजनी रनदिवे , संगिता भोयर ,नंदिनी लाहोळे , चैताली आत्राम,सुविद्या बांबोडे, सिमा पाटील, मुंबईच्या श्रुती उरणकर ,वर्षा आत्राम , मूलच्या वंदना आगरकाठे ,कल्याणी इटनकर, वर्षा कोंगरे , भाग्यश्री हांडे ,संगिता चिताडे, जास्मिन शेख , मंथना नन्नावरे,शारदा मेश्राम, प्रियंका मेश्राम, आदीं अनेक महिला व युवती या गृपच्या सदस्या आहे.