महाकाली महोत्सव निमित्त नवरात्रोत्सव दरम्यान जन्मलेल्या कन्यांना महाकाली सेवा समिती भेट स्वरूपात देणार चांदीचा सिक्का

0
699

महाकाली महोत्सव निमित्त नवरात्रोत्सव दरम्यान जन्मलेल्या कन्यांना महाकाली सेवा समिती भेट स्वरूपात देणार चांदीचा सिक्का

 

1 ऑक्टोंबर पासुन चंद्रपूरात आयोजित महाकाली महोत्सवा निमित्त बेटी बचाओ चा संदेश देण्यासाठी नवरात्रो उत्सवादरम्यान जन्मास आलेल्या कन्यांना भेट स्वरूपात चांदीचा सिक्का देण्याचा निर्णय महाकाली सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. सदर सिक्के माहेश्वरी सेवा समितीचे अध्यक्ष सि.ए. दामोदर सारडा यांनी देण्याची घोषणा केली आहे.

चंद्रपूरची अराध्य दैवत माता महाकाली व येथील मंदिराची प्रचिती राज्यभरात पोहचविण्यासाठी चंद्रपूर मतदार संघाचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन तथा माता महाकाली भक्तांच्या वतीने स्थापण करण्यात आलेल्या माता महाकाली सेवा समितीच्या वतीने 1 ऑक्टोंबर पासुन माता महाकाली मंदिर पंटागणात चार दिवसीय भव्य श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सावत प्रसिध्द जागरणकार, गायीका, भजन मंडळे, कथा वाचक सहभागी होणार आहे. सदर महोत्सवा दरम्यान बेटी बचाओ चा संदेश देण्यासाठी नवरात्रोत्सव दरम्यान चंद्रपूरात जन्मास येणा-या कन्यांना भेट स्वरूपात चांदीचा सिक्का देण्याचा निर्णय माता महाकाली सेवा समितीच्या वतीने करण्यात आला होता. त्यानंतर सदर सिक्के देण्याची जबाबदारी माहेश्वरी सेवा समितीचे अध्यक्ष सि.ए. दामोदर सारडा यांनी स्विकारली आहे. सदर सिक्के महाकाली महोत्सवा दरम्यान मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. तरी 26 आॅक्टोंबर ते 4 आॅक्टोंबर या नवरात्रो उत्सवा दरम्यान चंद्रपूरात जन्मलेल्या कन्यांच्या पालकांनी महाकाली मंदिराच्या कार्यालयात किंवा महाकाली महोत्सव सेवा समितीच्या मंडपात संपर्क साधण्याचे आवाहन माता महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here