आप च्या मेळाव्याला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर जिल्ह्यात 5000 यूवाना आप मध्ये जोडनार – मयूर राईकवार
चंद्रपुर मध्ये सुद्धा आलेत 50 खोके तरी जनता कशी काय ओके – अजिंक्य शिंदे
दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी आम आदमी पार्टी चे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांच्या 130 करोड़ जनतेला जोडण्याच्या संकल्प यूथ विथ मेक इंडिया नंम्बर 1 च्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. या अनुषंगाने सम्पूर्ण महाराष्ट्रा मध्ये आप युवा आघाडी तर्फे युवा संमेलन घेऊन इंडिया नंबर 1 कसा होईल या मध्ये युवा युवतीची काय भूमिका असेल हे सांगण्यात आले . हाच संकल्प घेऊन चंद्रपुर येथे जिल्हा मध्यवर्ती बैंक सभागृह येथे युवा संमेलन आयोजित करण्यात आले होते.
मेक इंडिया नंम्बर 1 बनविन्याकरीता युवा संमेलन जिल्हा मध्यवर्ती बैंक येथे आयोजित करण्यात आले होते , आलेल्या पाहून्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बैंड बाजा वाजवत सभागृह पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. डॉ .बाबा साहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला विनम्र आदरांजली देऊन, द्वीप प्रज्वलन करण्यात आले . या कार्यक्रमात स्टेज वर दिल्ली मधील नगर निगम नगरसेवक बिमलेश कोली, आप राष्ट्रीय परिषद सदस्य आबिद खान, युवा प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे, युवा विदर्भ अध्यक्ष पीयूष आकरे, युवा राज्य समिति सदस्य कृतल आकरे, युवा संघटन मंत्री सन्दीप सोनवणे, महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष क्षितिज पगार, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा शहर अध्यक्ष संतोष बोपचे, तर जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी , महिला अध्यक्षा ऍड. सुनीता पाटिल विराजमान होते. संचालन जिल्हा सचिव संतोष दोरखंडे यांनी केले तर समारोपीय भाषण मयूर राइकवार यानी केले.
दिल्ली नगर निगम नगरसेवक बिमलेश कोली यांनी युवा युवतीना आव्हान देत भविष्य तुम्हीच आहात, देश तुमच्या हातात आहे , मोदी मुळे बेरोजगार आहात, पुढच्या काळात अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान बघायचे असेल तर भाजपाला हरवावे लागेल. , हे शक्य फक्त युवा युवतीं च करू शकतात तुम्हीच भविष्य आहे, इंडिया नंम्बर 1 युवाच्या सहभागाने होईल असे सांगत आपले मनोगत समाप्त केले. तर आबिद खान राष्ट्रीय परिषद सदस्य यानी दिल्ली सारखी सोई सुविधा देने हे स्थानीक सरकार चे काम आहे , दिल्ली तील आप सरकार देउ शकते तर महाराष्ट्रा मध्ये का नाही , युवा ना पुढे न्यायचे आहे असे सांगत आपले 2 शब्द समाप्त केले. तर युवा संघटन मंत्री यानी पुढील वाटचाल व युवकांच्या दिशेबद्दल मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यानी आमदार ला टोला देत गुवाहाटी जाऊन 50 खोके आणले पन जनता कशी काय ओके म्हनत जनतेनी आमदाराला जाब विचारावा असे आव्हान केले. पीयूष आखरे आणि कृतल आखरे यांनी जशी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तशी नगरसेवक , आमदार खासदार बनवण्याची तयारी करायला सांगितले, युवा खासदार आमदार नगरसेवक आपल्या पक्षात आहेत तसे तुम्ही पन होउ शकता सांगत राजकारण मध्ये युवा चा सहभाग किती महत्वाचा आहे हे सांगितले गेले. युवा जिल्हाध्यक्ष यानी युवा मध्ये भाषना द्वारा युवकात जोश भरला व युवा आघाडी चा अभियान पूर्ण पने पार पाडन्यात आम्ही सर्व सक्रिय आहोत असे सांगितले . घरचा विरोध जरी असेल तरी राजकारणात येने युवाना जरूरी आहे, . समर्थकानी नारे बाजी करत मयुर भाऊ चा पाठबळ दाखवले. तसेच 100 हुन अधिक नागरीकानी सामूहिक पक्ष प्रवेश करण्यात आला.
आभार प्रदर्शन भिवराज सोनी यांनी केले.
यावेळी भद्रावती तालुका अध्यक्ष सोनल पाटिल, सचिव सुमित हस्तक, घुग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर, बल्लारपुर तालुका अध्यक्ष रवि पुप्पलवार, ब्रह्मपुरी तालुका अध्यक्ष नावेद खान , जिल्हा सोशल मीडिया हेड राजेश चेडगुलवार, एड राजेश वीराणी, रहेमान खान , राजू कूड़े , कालिदास आरके, सीकंदर सागोरे सहप्राभारी, आरती आगलावे महीला सचीव, जासमीन शेख महीला उपाध्यक्ष, रूपा काटकर महीला उपाध्यक्ष, शबनम शेख महीला कार्यकारी अध्यक्ष, सुहास रामटेके झोन 3 महीला अध्यक्ष, मीना ताई पोटफोडे, महीला उपाध्यक्ष, मंगला मुके, झोन नंबर एक महीला अध्यक्ष, सुहाणी मॅडम, झोन नंबर एक महीला उपाध्यक्ष,संतोषी मॅडम, वंदना कुंदावार महीला सहसचिव, शील्पा कांबळे मॅडम, पारवता पीचोडे मॅडम, सय्यद उस्मान, सय्यद फारुख, शाहाबाजजी सरफराज जी, झोन नंबर दोन संघटक, मनोहर पाटील झोन नंबर दोन सहप्रभारी, मुकेश पांडे झोन नंबर दोन पदाधिकारी, जसमीत महेश सींग झोन नंबर दोन पदाधिकारी सुमीत शुक्ला ,झोन नंबर दोन पदाधिकारी,अक्षय ठाकूर ,युवा उपाध्यक्ष, साखरकर काका जेष्ठ पदाधिकारी, सुनील सदभैया प्रभारी , सुनील भोयर, एड किशोर पुसलवार, परमजीत सिंह झगड़े, डॉ देवेंद्र अहेर, तसेच सर्व तालुका , शहर, जिल्ह्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.