देवदूत वगैरे आजिबात नाही… आपला रुग्णसेवक

0
794

देवदूत वगैरे आजिबात नाही… आपला रुग्णसेवक

मंगेश नरसिंह चिवटे, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष – विशेष कार्य अधिकारी वैद्यकीय मदत कक्ष यांचे मनोगत!

 

 

जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 

 

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्याची संकल्पना मी तत्कालीन मुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मांडली होती… त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला, आणि सुमारे 4 महिन्याननंतर यश आले…2015 साली मार्च महिन्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अस्तित्वात आला.

माझ्याच आग्रहामुळे आणी पाठपुराव्यामुळे तत्कालीन सरकारच्या काळात माझा तत्कालीन मित्र ओमप्रकाश याची या वैद्यकीय मदत कक्षाच्या प्रमुख पदी निवड करण्यात आली होती. मला अजूनही आठवतंय 3 मार्च 2015 रोजी रात्री 1 वाजता वाजता वर्षा निवासस्थानी, तत्कालीन मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांनी “मंगेश, ही तुझी संकल्पना आहे तर तूच जबाबदारी सांभाळ” असे म्हणाले होते. पण त्यावेळी पत्रकारिता करिअरचे एवढे भूत डोक्यावर सवार होते की, त्यावेळी मी ठामपणे यास नकार दिला होता, आणि माझ्याएवढंच प्रामाणिकपणे – जबाबदारीने ओमप्रकाश काम करेल असा विश्वास देत त्याचीच order काढा असे सांगितले होते…

अर्थात , माझी निवड आणि निर्णय दोन्ही चुकले याची जाणीव कालांतराने झाली… मी त्याचवेळी वैद्यकीय क्षेत्रात पूर्ण वेळ काम करण्यास सुरुवात करायला हवी होती असे वाटतें…

अर्थात मी थांबलो नाही, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या
याच धर्तीवर 17 नोव्हेंबर 2017 रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख मा ना श्री आदित्यजी ठाकरे साहेब आणि राज्याचे नगरविकास मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली….आज या ठिकाणी जोमाने काम सुरू आहे…

मी देवदूत वगैरे आजिबात नाही… आपला रुग्णसेवक,

मंगेश नरसिंह चिवटे,

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष.
विशेष कार्य अधिकारी वैद्यकीय मदत कक्ष.
सदस्य – महात्मा फुले जन आरोग्य योजना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here