आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते १६ लक्ष ९५ हजार रुपयांच्या विकास कामांचे भुमीपूजन

0
510

आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते १६ लक्ष ९५ हजार रुपयांच्या विकास कामांचे भुमीपूजन

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नातून एम. ई एल. प्रभागातील विकास कामांना मंजूरी

कोरोनाच्या संकटाचा विकास कामांवर परिणाम झाला असला तरी विकास कामे थांबता कामा नये अशी आपली भुमीका आहे. शहराच्या शेवटचा भाग असलेल्या एम. ई. एल. प्रभागातील कृष्णा नगर येथील रस्ता व नालीच्या बांधकामासाठी सामाजिक न्याय विकास निधी अंतर्गत निधी उपलब्ध करुन देता आला याचा जेवढा आंनद आहे त्याहून अधिक येथील नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण करता आला याचे समधान वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांने सामाजिक न्याय विकास निधी अंतर्गत १६ लक्ष ९५ हजार रुपयांच्या निधी एम. ई. एल. प्रभागातील कृष्णा नगर विकास कामासाठी मंजूर झाला आहे या निधीतून येथील कॉंक्रीट रोड व नालीचे बांधकाम करणार येणार असून आज या कामाचे भूमीपुजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे वृषभ परचाके, आनंद रणशूर , संतोष पवार, आकाश पुट्टेवार, आदिंची उपस्थिती होती.
एम. ई. एल. प्रभागातील कृष्णा नगर हा चंद्रपूर शहरातील शेवटचा भाग आहे. त्यामूळे या प्रभागाकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. परिणामी येथे अपेक्षीत असा विकास झालेला नाही. मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी दूर्लक्षीत प्रभागातील विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यांनी आपला पहिला निधी पिण्याच्या पाण्यासाठी खर्च करत २५ लक्ष रुपयात शहरात १३ बोरवेलचे बांधकाम केले आहे. दरम्याण आता कृष्णा नगर येथील कॉंक्रीट रोड व नालीच्या बांधकामासाठी त्यांनी १६ लक्ष ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आज शुक्रवारी त्यांच्याच हस्र्ते आज शुक्रवारी या बांधकामाचे भुमीपूजन पार पडले. यावेळी येथील नागरिकांची उपस्थिती होती. अनेक वर्षापासुन प्रलंबीत असलेली समस्या मार्गी लागल्याने येथील नागरिकांनी आंनद व्यक्त केला तसेच आमदार किशोर जोरगेवार यांना पूष्पगुच्छ देवून सन्मान केला. शहराचा सर्व समावेशक विकास करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न सुरु असून निवडणूकी दरम्याण येथील नागरिकांना दिलेला शब्द पाळता आला याचे अधिक समाधान असल्याचे यावेळी आ. जोरगेवार यांनी म्हटले, कोरोनाचे संकट निवळल्यानंतर विकास कामांना आणखी गती येणार असून विकास कामांबरोबरच नागरिकांच्या इतर समस्या सोडविण्यावर आपला भर असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले. यावेळी विधिवत पुजन करुन फलकाचे अनावरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here