वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज – श्रीराम पी.एस. युनिट हेड, अल्ट्राटेक सिमेंट आवारपूर
नांदाफाटा:पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे असे प्रतिपादन अल्ट्राटेक सिमेंट कंपनी चे युनिट हेड यांनी अल्ट्राटेक कम्युनीटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर व श्री. शिवाजी इंग्लिश स्कूल, नांदा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्त बोलताना केले.
यावेळी श्री. शिवाजी इंग्लिश स्कूल, नांदा फाटा यांच्या विद्यार्थ्यांनी बँन्ड च्या स्वरात पाहुण्यांचे स्वागत केले. एकूण ४० रोपांची लागवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला अल्ट्राटेक चे युनिट हेड श्रीराम पी. एस., उपाध्यक्ष, गौतम शर्मा, महाव्यवस्थापक, कर्नल दीपक डे, प्रभारी प्रिन्सिपल रत्नाकर चटप, शिक्षक वृंद, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन शिशिका प्रिन्सी मॅडम तर आभार प्रदर्शन सीएसआर, अधिकारी सचिन गोवारदीपे यांनी केले प्रास्तविकता भटाळ मँडम तर प्रकाश उपरे द्वारे व त्यासोबत वृक्षारोपणावरती कविता सादर करण्यात आली शिक्षक व एकूण २५० विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. युनिट हेड, श्रीराम पी.एस., उपाध्यक्ष गौतम शर्मा आणि महाव्यवस्थापक कर्नल दीपक डे यांचे द्वारे विद्यार्थ्यांना वृक्षारोपणावरती मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी.एस. आर. प्रमुख सतीश मिश्रा, सचीन गोवारदीपे, संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांचे सहकार्य लाभले.