बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात सर्वसामान्यांच्या जीवाची किंमत नाही – आम आदमी पार्टी
तालुका प्रतिनिधी/रोहन कळसकर
बल्लारपूर : आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर अध्यक्ष रविकुमार पुप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली व शहर निवडणूक प्रभारी प्रा. नागेश्वर गंडलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शिष्टमंडळाने ग्रामीण रूग्णालय बल्लारपूरचे डॉ. गजानन मेश्राम यांची भेट घेऊन विविध समस्यांची माहिती दिली.
वारंवार निवेदनाद्वारे मागणी करूनही योग्य ती कार्यवाही होत नसल्याने रूग्णालयात सर्वसामान्यांच्या जिवाशी खेळला जात आहे, योग्य उपचार न मिळाल्याने आजारी रुग्णांचे हाल होत आहेत.
बल्लारपूर विधानसभेतून अनेक दा निवडून आलेले स्वयंघोषित विकास पुरुष आमदार हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळात असून ही शहरात ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव आहे.
बल्लारपूर शहरातील ग्रामीण रूग्णालयात
१) चिट्टी काढण्यासाठी तासन्तास उभे राहावे लागते.
२) दिव्यांग, वृद्धांसाठी स्वतंत्र चिट्टी काउंटर नाही.
3) कर्मचार्यांची रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी वागणूक चांगली नाही.
४) एका बेड वर दोन ते तीन आजारी लोकांना ठेवण्यात येत आहे.
५) बाहेरून औषध खरेदी करण्यास सांगितले जात आहे.
६) प्रसाधन गृहे अजिबात स्वच्छ नाहीत.
7) डेंग्यू, मलेरियासारख्या चाचण्या केल्या जात नाहीत.
8) रक्ताचा अहवाल लवकर मिळत नाही.
९) रक्ताचे नमुने घेण्यासाठी अनेक वेळा सुई टोचली जात आहे.
१०) लहान मुलांवर योग्य उपचार केल्या जात नाही.
या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी निवेदन देण्यात आले, तातडीने कार्यवाही न झाल्यास “AAP” बल्लारपुर तर्फे आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.
यावेळी शहर अध्यक्ष रविकुमार पुपलवार, उपाध्यक्ष सय्यद अफजल अली आणि गणेश सिलगमवार, सचिव ज्योती बाबरे, महिला अध्यक्षा अलका वाले, महिला उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी, महिला संघटक सरिता गुजर आणि किरण खन्ना, यूथ अध्यक्ष सागर कांबळे, युथ संघठक अलिना शेख, विशाखा चौधरी, बेबी बुरडकर, प्रणय नगराळे , रसूल शेख आणि इतर क्रांतिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.