जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची शहिद चौकातील उपोषण स्थळी भेट
माजी सैनिक सागर कोहळे यांच्या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुचना
दि. १७ सप्टेंबर : उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी माजी सैनिक सागर कोहळे यांच्या रहात्या घरासंदर्भातील प्रकरणात बेकायदेशीरपणे आदेश पारीत करून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना केल्याच्या विरोधात श्री. सागर कोहळे यांनी स्थानिक शहीद चौकात उपविभागीय अधिकारी श्री. शिंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी कालपासून (१६ सप्टेंबर) आमरण उपोषण सुरू केले आहे.
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार आज सायंकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी या उपोषणस्थळाला भेट देऊन श्री. सागर कोहळे यांचेकडून सदर प्रकरण समजून घेतला.
उपविभागीय अधिकारी वरोरा यांचेकडून झालेला हा प्रकार अतिशय गंभीर असून यात वरीष्ठांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. या भेटीप्रसंगीच त्यांनी मा. जिल्हाधिकारी महोदयांना या प्रकाराबाबत भ्रमणध्वनीवरून कळविले. आणि उद्याच याठिकाणी भेट देऊन माजी सैनिक सागर कोहळे यांना न्याय्य देण्याच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करावी असेही सांगितले.
याप्रसंगी, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, शहराध्यक्ष सुरेश महाजन, बाबाभाऊ भागळे, भाजयुमोचे अमित चवले, माजी नगराध्यक्ष विनोद लोहकरे, प्रकाश दुर्गपुरोहित, दिपक भुरे, दादू खंगार, संजय राम, श्यामजी ठेंगडी, राहूल बनकर, सौ. हर्षदाताई कोहळे यांचेसह आदी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.