चित्रपट चंद्रपुरात तयार झाला… चर्चा मात्र थेट अमेरिकेत..!!!
प्रतिनिधी : सुशिल लभाने, चंद्रपुर
चंद्रपूर च्या युवकाची फिल्म “पल्याड” देश विदेशात धुमाकुळ घालतेय…
ऐतिहासिक आणि कला क्षेत्राशी नाळ जोडलेल्या चंद्रपूर शहरातील युवकाच्या नावाची डायरेक्ट अमेरिकेत होत आहे चर्चा…
आपल्या मराठी ची भुरळ आता अमेरिकेच्या घरा-दारात…
सविस्तरवृत असे की चंद्रपूर येथील रहीवासी दिग्दर्शक शैलेश भिमराव दुपारे या युवकाची मराठी फिल्म “पल्याड” लॉकडाऊन मध्ये कठीण परीस्थितीत तयार झाली. त्या नतंर अनेक प्रतिष्ठीत फिल्म फेस्टिवेल मध्ये पारितोषिक मिळवुन जेव्हा फिल्म अमेरिका, चीन, दक्षिण कोरीया, भुतान, न्युयॉरक, स्पेंन, लडंन, हॉगकॉग, टोरंटो, टोकीयों, सिक्कींम, न्यु दिल्ली, कोलकत्ता, तमिलनाडू, ढ़ाका, मुबई, स्विड़न, यु.एस.अे. अशा अनेक ठीकाणी फेस्टिंवेलद्वारे स्क्रींनिंग करण्यात आली.चित्रपटाचा चालु असलेला हा प्रवास थक्क करणारा आहे. “पल्याड” मराठी चित्रपटसृष्टीचे तसेच आपल्या देशाचे विदेशी भुमीत प्रतिनिधीत्व सक्षमरित्या पार पाडतोय.. अवार्डस् मिळवतोय.. अशा अनेक ठीकाणी राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय, विदेशात जाऊन धुमाकुळ घालतोय… चर्चा तर तेंव्हा वाढली जेंव्हा अमेरिकेच्याच नव्हे तर, जगातल्या सर्वात महत्वाच्या समजल्या जाणार्या Hollywood & Entertainment industry मधील “FORBES” आणि CINEQUEST या advancement & news संस्थे ने देखील “पल्याड” (the other side) चित्रपटाची दखल घेतली… या ऐतिहासिक घटनेची नोद घेतली.. आणि पल्याडची चर्चा जगभरात व्हायला लागली व “पल्याड” जगाच्या काना-कोप-यात जाऊन पोहचली..
अशा या “पल्याड” फिल्मचा तयार होण्याचा प्रवास काही सोपा नव्हताच.. लॉकडाऊनच्या काळात पहिल्या लाटेत चंद्रपुर येथे सुरु असलेली शुटींग अर्धवट बंद पडली. तरी ना उमेद न होता पल्याड टीम ने पुन्हाः त्याच जोंमाने चित्रपटाचे शुटींग निर्बध हटल्या नतंर पुर्ण केले.. अनेक अडचनी येऊन देखिल चित्रपट तयार झाला… त्या नतंर मात्र “पल्याड” कुठे थांबलाच नाही… अनेक ठीकानी पारितोषीक मिळालेय मिळवतोय..आणि कौतुक ही होतय.. हा विजयी रंथ आजत्यागंत चालुच आहे चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपट गृहात ४ नोव्हेबंर ला प्रदर्शीत होतोय.. तो पर्यन्त अशा अनेक फेस्टिवेल मध्ये बेस्ट फिल्म अवार्ड घेतच राहील हे निश्चित.. हे मिळणार यश कोन्हाः ऐकटयाचे नसुन सपुर्ण “पल्याड” टीम आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या “पल्याड” शी जोडल्या गेलेल्या त्या प्रत्येक प्रामाणिक व्यक्ती चे आहे असे लेखक सुदर्शन खडांगळे बोलत होते.. तसेच..
एलिवेट फिल्मस् आणि लावण्याप्रिया आर्टस् ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पल्याड’ या मराठी सिनेमाची निर्मिती झाली.. चित्रपटाचं शूटिंग चंद्रपुर जिल्हयातील सिंदेवाही, मरेगांव, कुकडहेटी, चिकमारा, शिवनी, राजोली, घोट या ग्रामिण भागात पार पडले “पल्याड” हा सामाजिक विषयाला भाष्य करणार्या एका परिवारात घडलेल्या काही कडू-गोड गोष्टीवर आधारीत संवेदनशील चित्रपट आहे. “पल्याड” या चित्रपटाचे दिग्दर्शन चद्रपुर शहरातील सुपुत्र शैलेश भिमराव दुपारे एफ.टी.आय.आय (FTII) मध्ये दिग्दर्शनाचे प्राविण्य मिळवलेल्या मराठमोळ युवकाने केलय तर चित्रपटाची कथा लेखक सुदर्शन खडांगळे यांनी लिहीलीय. तसेच चित्रपटातील उत्कृष्ठ आणि प्रेक्षकांना खिळून ठेवणारी पटकथा – संवाद लेखक सुदर्शन खडांगळे व शेलेश दुपारे यानी लिहीलीय. या चित्रपटा मध्ये २५ लोंकाची टेक्निकल टीम अहोरात्र काम करीत होती सगळे मिळून ७५ लोंक ह्या चित्रपटात दिसणार आहेत. चित्रपटात नॅशनल फिल्म अँवार्ड विजेते शंशाक शेंडे, नाळ चित्रपटातील चैत्याच्या आई ची भुमिका साकारलेल्या अभिनेत्री देविका दफतरदार, माझ्या नवऱ्याची बायको सिरियल मधिल देवेद्र दोडके, कोर्ट चित्रपटातले विरा साथीदार, सायली देठे, गजेश कांबळे, भारत रंगारी, रवि धकाते, आणि चंद्रपुर जिल्हातील बल्लारपुरच्या नवोदित बालकलाकार रुचित निनावे याला संधी देण्यात आली, छायाकंन – मोहर माटे, वेशभुषा- विकास चहारे, मेकअप- स्वप्निल धर्माधिकारी, आर्ट डिरेक्शन- अनिकेत परसावर, ऐड़ीटींग- मनिष शिर्के यानी केलय.. चित्रपटात ४ गाणी असून चित्रपटाची गाणी अरुण सागोंळे व प्रंशात मडपुवार यांची असून संगीत दिग्दर्शन जगदीश गोमिला व सॅम.ए.आर, तुषार पारगावकर, ह्यांनी दिलंय. चित्रपटाचे वितरक के.सेरा सेरा हे चित्रपटाचं मार्केटींग म्हणुन काम पाहत आहे..कास्टिंग डायरेक्शन भद्रावती येथील प्रेम रायपूरे यांनी केले तसेच.. “पल्याड” चित्रपटाचे लेखक सुदर्शन खडांगळे हे मास- कम्युनिकेषण संज्ञापण विभाग अहमदनगर न्यु आर्टस् चे विद्यार्थी आहे या आधी अनेक मराठी- हिंदी चित्रपटा मध्ये बॅकस्टेज काम करण्याचा दान्डगा अनुभव पाठीशी घेऊन मराठी चित्रपटसृष्टीत गरूडझेप घेतलीय लेखक म्हणुन त्याची अनेक फिल्म, शॉटफिल्म, नाटक, सिरियल.. या मध्ये आजत्यागत सहभाग नोंदवलाय.. नुकतीत मायबोली मराठी वर प्रदर्शित होत असलेली आर्विक प्रोड़क्शन ची मालिका “माझा ज्ञानोबा” या मालिके चे हे सह. लेखक तसेच नाशिक जिल्हा ऑल इडियॉ आर्टीस्ट प्रोड्युसर अँड टेक्निशियन युनियनचे ते जिल्हा अध्यक्ष आहेत.. लवकरच.. त्यांच्या scenario film production मध्ये अगामी येणार्या त्यांच्या पहील्या दिग्दर्शनासाठी असलेल्या नविन मराठी चित्रपटाचे प्री.प्रोड्क्शन चे काम नाशिक येथे लवकरच सुरू होईल त्यांत आपल्या भागातील कलांकाराना सधी देणार असल्याचे ते पत्रकारांशी बोलतांना सागत होते.. अशा या प्रतिभावंत कलाकाराला त्यांच्या पुढील यशस्वी प्रगतीशील वाटचालीस नवजीवन परिवारातर्फे अनंत मंगलमय हार्दिक शुभेच्छा..
आणि “पल्याड” चित्रपटाने भारतात बॉक्स ऑफिसवर विक्रमी नोंद व्हावी.. आणि प्रसिध्दीचे नवे उच्चांक गाठावे ही सदिच्छा!