राजुरा महामार्गावरून नागरिकांचा ‘जीवघेणा प्रवास’

0
733

राजुरा महामार्गावरून नागरिकांचा ‘जीवघेणा प्रवास’

 

राजुरा : सध्या शहरातून जाणाऱ्या महामार्गावरच्या खड्डयांची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. वाहतुकीच्या वर्दळीमुळे खड्डे आणखीनच खोल खोल होत चालले आहे. आणि याच महाकाय खड्डयांवरून प्रवास करताना प्रवाशांना ‘मरण’ दिसू लागले आहे. दरम्यान, खड्डे पडून दोन महिने लोटले आहे. पण खड्डे बुजवन्यावर एकही नेते बोलायला तयार नाही. आता नेत्यांचा धाक नसल्याने अधिकारीसुध्दा बिनधास्त असल्याचे वास्तव पुढे आहे.

शहरातून गडचांदूर व तेलंगणा राज्याकडे जाणारे दोन महामार्ग आहे. हे दोन्ही मार्ग अक्षरशः वर्दळीचे आहे.परराज्यातून मालवाहतूक सुरू असते. त्यामुळे या महामार्गाचे मजबुती व डांबरीकरण करण्यात आले आहे. यावर कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण सध्या या दोन्ही महामार्गाची दुरवस्था झाली आहे. मार्गात असंख्य लहानमोठे खड्डे पडले आहे. दिवसागणिक या खड्डयांचा आकार खोल होत चालला आहे. आता खड्डयांच्या बाजूचा रस्तासुध्दा उखळू लागला आहे. भर मार्गात गिट्टीचा सडा पडला असल्याने रस्त्याची चाळण झाल्याचे दिसून येत आहे. या खड्ड्यांतून प्रवास करताना वाहनधारकांची चांगली दमछाक होत आहे. प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. खड्डा चुकविताना तोल जाऊन कधी जीव जाईल याचा नेम नसल्याने जनतेमध्ये घबराट निर्माण झाली आहे. मुळात जनतेला महामार्गाची दुर्दशा पहायला मिळत आहे. पण अधिकारी व नेत्यांना जनतेच्या जीवनमरणाचे काहीही देणेघेणे नाही, असेच दुर्दैवी चित्र नजरेस पडत आहे. मागील दोन महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने महामार्गात पाणी जमा झाले. त्यामुळे या महामार्गाची पुरती वाट लागली आहे.

कोट्यवधीचा निधी खर्च केल्यानंतर पहिल्याच पावसाने कामाची पोलखोल चव्हाट्यावर आणली आहे. बसस्थानक, विश्रामगृह, जुना बसस्थानक, संविधान चौक, नाका नंबर ३, भवानी माता मंदिर, सास्ती वळण या परिसराचा रस्ता खड्डेमय झाला आहे. खड्डयात महामार्ग की महामार्गत खड्डे असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे या खड्डयांतून प्रवास करताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तोल जाऊन अपघाताच्या घटना सुध्दा घडल्याचे समोर आले आहे. पण संबंधित भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसून येत आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here