जिवती तालुका वनविभागातून वगळणेकरीता माजी केंद्रिय गृहराज्य मंञी हंसराज अहिर यांचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निवेदन
जिवती पं.स.चे उपसभापती महेश देवकते सह सादर केले राज्यपालांना निवेदन
राज्यपालांना जिवती येथे येऊन, परिस्थिती पाहण्याबाबत दिले निमंञण
जिवती :- न्यायालयीन बोम्मेवार प्रकरणामूळे जिवती तालुका संपूर्ण वनक्षेञ म्हणून घोषीत करण्यात आलेला आहे. चंद्रपूरचे तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी जिवती तालुका 100% वनक्षेञात असल्याचा अभिप्राय न्यायालयात सादर केल्यामूळे, संपूर्ण जिवती तालुका वनक्षेञात समाविष्ट असल्याचा न्यायालयांने निर्वाळा दिला आहे. जिवती तालुका संपूर्ण वनक्षेञात असल्यामूळे, तालुक्यातील विकास कामे, न.पं. क्षेञातील घरकुल बांधकामे तसेच शेती विषयक पट्टयाचा विषय आजही प्रलंबित असल्याने, नागरीकांमध्ये असंतोष आहे. जिवती तालुका वनक्षेञातून वगळणे करीता माजी केंद्रिय गृहराज्य मंञी हंसराज अहिर यांनी आज जिवती पं.स.चे माजी उपसभापती महेश देवकते यांचे सह राजभवन येथे जाऊन, राज्यपाल यांना निवेदन सादर करुन, वन विभागाचा गुंतागुंतीचा विषय समजाऊन सांगितले व त्या विषयावर सविस्तर चर्चा करून, मा.राज्यपालाकडे न्याय मागितले असता, मा.राज्यपाल महोदयांनी त्वरीत तोडगा काढण्याबाबत माजी केंद्रिय गृहराज्य मंत्री हंसराजजी अहिर यांना आश्वासीत करुन सकारत्मकता दाखविली आहे. त्याबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच वनमंञी यांनाही यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे.