गडचांदूर येथिल भ्रष्टाचाराची चौकशी त्रिसदस्यीय समिती करणार
दिपक वर्भे यांना जिल्हा प्रशासन अधिकारी यांच्या वतीने तसे पत्र प्राप्त
आश्वासन मिळताच आमरण उपोषण मागे
कोरपना प्रतिनिधी
गडचांदूर नगर परिषदेच्या दोन कर्मचा-याने प्लास्टिक च्या दंडांत्मक कार्यवाही केली यात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करित संबधीत कर्मच-याचे निलंबित करुन कार्यवाही करण्यात यावी अन्यथा १५ सप्टेंबर पासुन चन्द्रपुरात आमरण उपोषण करण्यात येईल अशी मागणी करीत जिल्हाधिकारी यानां निवेदन दिपक वरभे यांनी दिले होते.सदर निवेदनाची दखल घेत जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर यांनी त्रिसद्शिय समिती गठित करुन या प्रकरणाची सविस्तर चौकशी करुन दोषी असल्यास कार्यवाही करण्यात येईल या आशयाचे पत्र प्राप्त झाल्याने आज पासुन होणा-या आमरण उपोषण तुर्तास मागे घेण्यात येत असल्याची माहिती दिपक वरभे यानी एका पत्रकाद्वारे दिली आहे.
दि.२४ आगष्ट २०२२ ला दुपारी ३.३० वाजता मे.झुलुरवार कॉमप्लेक्स मधिल भवानी जनरल स्टोअर्स मध्ये प्रतिबंधीत असलेले प्लास्टिक वस्तूने भरलेली पिकअप वाहनातून उतरवित असल्याची कुणकुन गडचांदूर नगर परिषदेचे कर्मचारी कपिल नल्लेवार,व प्रमोद वाघमारे याना लागली. त्या ठिकाणी येवुन प्लास्टिक वस्तू ने भरलेली पिकअप वाहन पकडली नंतर गाडी मालकाशी बोलून त्यांच्या कडून दोन लाख रुपये वसुल केली व दंडाची पावती क्र ३३३८४ नुसार पन्नास हजार रूपये दंड वसुल केल्याचे दाखविण्यात आले व उर्वरित दिड लाख रुपयाची हेराफेरी केली. सदर सर्व प्रकार श्रीसंत झुलुरवार व भवानी जनरल स्टोअर्स च्या सिसीटिव्हित रेकॉर्ड झालेले आहेत असा दावा करीत कपिल नल्लेवार व प्रमोद वाघमारे यांची चौकशी करुन तात्काळ याना निलंबित करावे अन्यथा १५ सप्टेंबर पासुन जिल्हाधिकारी कार्यालय चन्द्रपुर येथे अमोरण उपोषण करण्यात येईल. अशी मागणी करीत जिल्हाधिकारी याना निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत चौकशी करीता त्रिसद्शिय समिती गठित केली या समितीत अध्यक्ष बल्लारपुर नगर परिषदचे मुख्याधिकारी विशाल वाघ,सदस्य म्हणून बल्लारपुर नगर परिषदेचे लेखापाल राजेश बांगर,पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता सुजित खामनकर यांच्या मार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी करुन तात्काळ अहवाल देण्याचे निर्देश देवुन सदर निलंबाबत कोणतेही पुरावे आढळून आल्यास नगर परिषदेच्या कपिल नल्लेवार व प्रमोद वाघमारे याना निलंबित करण्याचे कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावे अशा आशयाचे पत्र सामजिक कार्यकर्ते दिपक वरभे याना जिल्हा प्रशासन अधिकारी नगर विकास शाखा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर यांचे कडून प्राप्त झाले आहे. त्यामुळे दिपक वरभे यानी दिलेला अमोरण उपोषणाचा इशारा मागे घेतला आहे. आता प्रशासन कडुन कोणती कार्यवाही होईल या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.