घुग्घुस नगरपरिषदेने अंगणवाडी परिसरात साफसफाई करावी – उषाताई आगदारी
घुग्घुस, दि.१४ सप्टें. : आज घुग्घुस नगरपरिषद कार्यालयाला उषाताई आगदारी यांनी शहरातील अंगणवाडी येथील परिसरातील साफसफाई करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. घुग्घुस गावात बरेच वार्डातील अंगणवाडी परिसरात कचरा-काडी, घाणीमुळे वातावरण प्रदूषित होत आहे. अशी माहिती नागरिकांनी यंग चांदा ब्रिगेड, आ. किशोर जोरगेवार यांचे जनसंपर्क कार्यालय घुग्घुस येथे निवेदन देण्यात आले.
असा संदेश बहुजन महिला आघाडी शहराध्यक्षा व यंग चांदा ब्रिगेड नेत्या उषाताई आगदारी यांना मिळताच त्यांनी नगरपरिषद कार्यालय घुग्घुस ला तत्काळ निवेदन देण्यात आले.
अंगणवाडी परिसरात कचरा-काडी, घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. लवकरात, लवकर नगरपरिषदेने कर्मचारी, कामगार लावुन परिसर स्वच्छ करावे. अन्यथा अशा घाणीमुळे मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होणार तर यांस जबाबदार नगरपरिषद राहील.
यावेळी बहुजन महिला शहरध्यक्षा उषाताई आगदारी, यंग चांदा ब्रिगेडचे विलास वनकर, कामिनीताई देशकर, वंदनाताई निखाडे, भूदेवी अटेला, भारती सौदारी व इतर सदस्य उपस्थित होते.