विधवा महिलेला दोन खोल्यांचे विद्युत बिल 65 हजार 520 रुपये ; महावितरणा’चा महाप्रताप
विकास खोब्रागडे
चंद्रपूर / चिमूर तालुक्यातील मौजा पळसगांव (पिपर्डा)येथील प्रकार संपूर्ण राज्यात महावितरणने पाठविलेल्या वीज बिलामुळे गोंधळ उडाला असतांनाच चिमूर तालुक्यातील पळसगांव (पिपर्डा) येथील एका विधवा व मोडक्या घरात राहणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला तब्बल 65 हजार 520 रुपये इतके बिल महावितरणने पाठविले आहे. महावितरणाच्या भोंगळपणा उघडकीस आला आहे. विधवा महिलेला दोन खोल्याचं लाईट बिल 65 हजार 520 रु इतका आला आहे. एका गरीब विधवेच्या घरी वीजेची थोडीफार उपकरणं असतानाही तिला हजारो रुपये बिलं पाठवण्यात आली आहे. वनिता उत्तम शिवरकर असे या विधवा महिलेचे नाव आहे. लॉकडाऊनमुळे हातात कमी पैसे असताना हजारोंच्या घरात आलेली वीज बिलं कशी भरायची? असा प्रश्न या विधवा महिलेस पडला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता महावितरणने वाढीव वीज बिलांचा शॉक दिला आहे. याबाबत वनिता च्या मुलाने महावितरण कार्यालयात खेटेही घातले. वनीताबाई चे घर अवघं दोन खोल्यांचे. त्यांच्या घरात दोन किंवा तीन लाईट आणि एक छोटा टीव्ही. अशा घरात साधारण महिन्याचे लाईट बिल साधारण 500 ते 800 रुपयांपर्यंत येणं अपेक्षित आहे. पण सलग तीन महिन्याचे बिल हे सरासरी प्रमाणे सारखे युनिट जळून 2745 रु प्रमाणे आले होते. एका विधवा कुटुंबावरच अंधारात राहण्याची वेळ आली. महावितरणकडे नाईलाजाने नव्या मीटरची मागणी केली आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभाराने विधवा महिला संतप्त झाली आहे. वाणिताबाईला कसा न्याय मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“सदर बिला बद्दल भ्रमणध्वनी द्वारे विचारणा केली असता बिला बद्दल चौकशी करण्यात येईल काही त्रुटी असल्यास दुरुस्ती करण्यात येईल”
ओ. अ. मुकादम
महावितरण कनिष्ठ अभियंता चिमूर