विहीरगावच्या शेतशिवारातील विजेचे खांब धोकादायक

0
679

विहीरगावच्या शेतशिवारातील विजेचे खांब धोकादायक

महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

 

राजुरा : विरूर सबस्टेशनअंतर्गत येत असलेल्या विहीरगाव शेतशिवारात विजेचे खांब वाकले असून, काही खांब अक्षरशः जमिनीवर पडले आहे. मागील काही दिवसांपासून हे खांब अतिशय धोकादायक स्थितीत आहे. पण अजूनपर्यंत महावितरण विभागाला जाग आलेली नसल्याने कोणत्याही क्षणी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने वर्धा नदीकाठच्या शेतजमिनी पाण्याखाली आल्या आहे. यात उभे पिके जमीनदोस्त झाली आहे. याच पुराच्या पाण्यामुळे विहीरगाव व मूर्ती शेतशिवारातील विजेचे खांब वाकले आहे. यातील काही खांब तर अक्षरशः जमिनीवर पडले आहे. विजेच्या तारा लोंबकळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोणत्याही क्षणी जीवितहानीची भीती असल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. विजेचा स्पर्श लागून जनावरे मृत्यूमुखी पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळे शेतातील पाणी ओसरू लागले आहे. पण सध्या तरी महावितरण विभागाला जाग आलेली नसल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून विजेचे खांब धोकादायक स्थितीत आहे. तरी देखील विभाग मात्र निद्रावस्थेत असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. जीवित व पशुधनाची हानी झाल्यानंतरच विभागाला जाग येईल का, असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहे.

आज चिंचोली कडे पडलेले खांब लावण्याचे काम सुरू आहे. विरुर, पंचाळा, चनाखा ही साईड पडलेले खांब लावून पूर्ण झाले आहेत. विहिरगाव कडे पाऊस भरपूर असल्याने खांब नेणे अशक्य असल्याने खांब लावण्याचे काम रखडले होते. आता खांब नेणे शक्य झाले असल्याने उद्याला विहिरगाव शेतशिवारातील पडलेले व लोंबकळत असलेले खांब लावण्याचे काम पूर्ण करण्यात येईल.
श्री. मकासरे
उपविभागीय अभियंता
विद्युत विभाग, विरुर स्टे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here