अमराई वार्डातील स्थलांतरित कुटुंबियांचे आरोग्य बिघडले
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे तत्काळ रुग्णांना मदत
घुग्घुस येथील अमराई वार्डातील स्थलांतरित कुटुंबियांच्या मुलांचे रविवार, ४ सप्टेंबर रोजी अचानक आरोग्य बिघडले. याबाबत कळताच भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी जि.प. शाळेत धाव घेतली व काही मुलांना डॉ. सुरेश कोल्हे यांच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी तत्काळ भर्ती केले.
२६ ऑगस्ट रोजी घुग्घुस येथील अमराई वार्डातील एक घर भुस्खलनामुळे शेकडो फूट जमिनीखाली धसले. त्यामुळे येथील १६० कुटुंबियांना सुरक्षेकरीता जि.प. शाळेत व इतरत्र हलविण्यात आले. तेव्हा पासून अमराई वार्डातील स्थलांतरित कुटुंबीय जि.प.शाळेत राहात आहे. परंतु त्यांच्या सोयीसुविधे कडे वेकोलि, न.प.प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्या मुलांचे व मुलींचे आरोग्य बिघडत आहे.
रविवारी अचानक अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली लगेच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व भाजपा पदाधिकाऱ्यांनी जि.प.शाळेत धाव घेतली व आजारी असलेल्या मुलांना तत्काळ डॉ. सुरेश कोल्हे यांच्या खाजगी रुग्णालयात भर्ती केले. उपचाराचा सर्व खर्च आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र करणार आहे.
यावेळी भाजपाचे अमोल थेरे, बबलू सातपुते, शरद गेडाम उपस्थित होते.