महाराष्ट्रात सध्या मोठा राजकीय पेच निर्माण होताना दिसत आहे.दसरा मेळावा दोन वर्षांनी होत असल्याने शिवसैनिक अर्थात मूळ शिवसैनिक फारच अभिमान व उत्साह बाळगून आहे. यात काही दिवसापूर्वी राज्यात मोठा गोंधळ निर्माण करून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. हे सरकार जनतेला मान्य की अमान्य याचा हिशोब अद्याप आगामी निवडणुकीत होईल. मुंबई कशी करून काबीज करणे, व मराठी माणूस उध्वस्त करणे हे भाजप नेते किरीट सोमय्या, कंबोज , आदी परप्रांतीय नेत्यांचे अघोषित टार्गेट आहे. दुर्दैवाने शिंदे व फुटीर गट याला बळी पडला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा विरोधकांना नामोहरम करण्या करिता वापरणे , भाजप मध्ये गेला की तो शहाणा होतो, त्यांचे सर्व आरोप संपून जातात ते अगदी शांत झोपतात असे सध्या चित्र आहे.
दसरा मेळावा हा शिवसेनेचा “अस्मितेचा “प्रश्न आहे, खरी शिवसेना कोणती हा प्रश्न ही उभा राहिला आहे. राज्याचा आढावा घेतला तर मूळ सैनिक उध्दव ठाकरे यांच्या बरोबर आहे. स्वार्थी , बाजारू, ठेकेदार , आदी सत्तेच्या धुंदीत शिंदे यांच्या बरोबर गेले.अर्थात ते साहजिक आहे, ही मंडळी अशी असतात की जिकडे घुगऱ्या तिकडे उदोउदो …
उध्दव ठाकरे यांना काम करण्याची मोठी संधी मिळाली होती ,ती त्यांनी समर्थपणे पार ही केली. राज्यातील कोरोनो ला त्यांच्या सरकार ने समर्थ उत्तर देऊन, जनतेचे प्राण वाचवले, इथेच भाजपचा तिळपापड झाला. शिंदे सारखा पोरकट माणूस त्यांनी आपल्या गळाला लावला , पन्नास खोके खुले आम् ऑफर बोलली जाते, भाजप व शिंदे समर्थक आमदार हा दावा खोडून काढताना दिसले नाही. उलट काय डोंगर ,झाडी सगळे ओके अशी जोकर भाषा राज्याच्या समोर आली. ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांचा वापर करून, दमबाजी करून विरोधक संपवण्याचे काम भाजप ने केले व हे आमदार त्याचे बळी ठरले, आज राज्यात निवडणुका झाल्या तर शिंदे हे पाहिले मुख्यमंत्री असतील की त्यांनी निवडणूक हरलेली असेल.
दसरा मेळावा बाबत सत्ता म्हणून संघर्ष करण्याची तयारी शिंदे गटांनी घेतली आहे. तो म्हणजे दिवा मालवत असताना होणारी फडफड आहे. वास्तविक त्यांनी शांत राहणे हे मोठेपण होते, पण विनाश अटळ असतो तेव्हा बुद्धी चालत नाही.
देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या बाबत शिंदे यांना सल्ला दिला आहे,वास्तविक त्यांनी तो पाळला पाहिजे, नाही तर सैनिक आक्रम काय असत हे सरकारला आवरणे कठीन आहे. या बाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी ही सरकारला विशेष समज दिली आहे.
दसरा मेळावा काही केलं तरी शिवसेना करणारच. राज्यात अजून तरी शिंदे गटाला शिवसेना रूप आले नाही. ते येणार पण नाही.
राज्यातील चित्र आज वाईट आहे, स्वतः मुख्यमंत्रीच राज्यात तणावाचे वातावरण निर्माण करताना दिसत आहे.भाजप तेल टाकतो आहे. पण त्यांना माहिती नाही की पुढे काय होणार आहे. काही केलं तरी भाजप ची मुंबई, नवी मुंबई, कल्याण , पुणे , कोल्हापूर, आदी महा नगर पालिका मध्ये सत्ता येत नाही. ग्रामीण महाराष्ट्रात राष्ट्रवादी, शिवसेना युती झाली तर भाजप पूर्ण उध्वस्त होईल . सध्या काँग्रेस चे आमदार गोळा करण्याचे काम चालू आहे. काँग्रेस आमदार जे भाजप मद्ये जातील त्यांच्या पूर्ण खानदान मध्ये ते आमदार दिसणार नाही. राहुल गांधी यांची इमेज तयार होत आहे. मोदी पंतप्धानपदाच्या काळात एका ही पत्रकार परिषदेत बोलले नाहीत. सार्वजनिक बाबी, प्रामुख्याने महागाई, बेरोजगारी, महिला असुरक्षतेच्या मुद्यावरून ते पळ काढतात. शेतकरी जगला पाहिजे ही भूमिका असलेला चेहरा भाजप कडे नाही.कामगार, व्यापारी सह पूर्ण हिंदी पट्टा मोदी विरोधात जोर धरून आहे. बिहार मधून भाजप ची हाकल पट्टी झाली आहे. उत्तर प्रदेश मधून समाजवादी पक्ष खासदार वाढतील, मध्य प्रदेश. राजस्थान मध्ये काँग्रेस भरारी घेईल, महाराष्ट्रात महा विकास आघाडी ३५ पेक्षा जास्त खासदार निवडून आलेले दिसतील, यात पुन्हा प.बंगाल मध्ये ममता हटणार नाही. दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा मध्ये भाजप हैराण आहे.तामिळनाडू मध्ये तर विषय च नाही. दक्षिण भारतातील एखादी व्यक्ती पुन्हा देशाचे पंतप्रधान होऊ शकतात , तो आक्रमक चेहरा असेल. २०२४ नंतर भाजप नेते गायब असतील . न्यायालय, केंद्रीय तपास यंत्रणा, बँका मोकळ्या श्वास घेतील.
राज्यात राष्ट्रवादी ,शिवसेना ,काँग्रेस आघाडी न भूतो न भविष्य असे यश संपादन करेल. शिंदे इतिहास जमा असतील किंवा जेल मध्ये असतील. जो न्याय मोदींनी दिला तसाच न्याय त्यांना पुढील सरकार देईल.
दसरा वाद थांबला पाहिजे, जनतेच्या मनातील शिवसेना जी आहे ,त्याचा आदर केला पाहिजे. शिंदे आज दारोदारी गणपती पाहत फिरत आहे, राज्य आज अती वृष्टी , नुकसान , आदिने होरपळून निघाले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न स्वतः सरकारच निर्माण करीत आहे, महिला अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. सरकारी कार्यालयात लाच घेतली तरच काम होत आहे. सर्व सामान्य माणूस हैराण आहे. या बाबींचा विचार करून शिंदे फडणवीस सरकारने वागले पाहिजे. ते वागणार नाहीत , सत्ता व माज याचे ते प्रतिक बनले आहेत.हे फार काळ टिकणार नाही, एखाद्या मंत्र्यांच्या कार्यक्रमास डझनभर अधिकारी, अन् पाच कार्यकर्ते ,तर विरोधी पक्ष नेते अजित पवार काही लाखोंची गर्दी जमवतात, तसेच आदित्य ठाकरे ही जमवतात यात बोलक्या महाराष्ट्राचे चित्र स्पष्ट दिसतें.
शिंदे फडणवीस सरकार यांनी मनाचा मोठेपण दाखवून , आपण किमान राज्यकर्ते आहोत, संविधान शपथ आपण घेतली आहे, असे तरी वागले पाहिजे. जर वागले नाही तर भाजप चा , शिंदे गट यांचा डेरा राज्यातून कायमचा उध्वस्त होईल, आज तरी होत आहे.
ज्ञानेश्वर गायकर पाटील
9422229700