महारॅलीसाठी आ. वडेट्टीवार शेकडो कार्यकर्त्यांसह दिल्लीत दाखल
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा समावेश
केंद्रातील भाजप सरकारच्या काळात बेरोजगारी, वाढती गरिबी, महागाई आणि द्वेषभावनेतून सुरू असलेल्या कारवाई विरोधात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने राजधानी दिल्ली येथे 4 सप्टेंबर 2022 रोजी महारॅलीचे आयोजन केले आहे. महा रॅलीत यशस्वीरित्या सहभाग घेण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार हे आपल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह राजधानी दिल्लीत दाखल झाले आहे.
देशात भाजप सरकार सत्तेत येताच महागाईच्या भस्मासुराने डोके वर काढले असून सर्वसामान्य गोरगरीब जनतेला जीवन जगणे कठीण झाले आहे. तसेच देशात धर्माच्या नावावर अराजकता पसरविण्यात येत असून सत्ताधारी पक्षाकडून विरोधी पक्षावर सूडबुद्धीने कारवाईचा सपाटा चालविला आहे. देशात वाढती बेरोजगारी ,महागाई, यामुळे देशाचा विकास तो दर घसरला असून केवळ व्यापारी वर्गांकडून जनतेची सर्रास लूट सुरू आहे. देशात सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची मुस्कटदाबी करणे हेतू तसेच लोकशाहीच्या नियमावलींना पायदळी तुडवून देशाच्या संविधानावर होत असलेला आघात व अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या दुषपरिणाम याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी देशाची राजधानी दिल्ली येथील रामलीला मैदानात महा रॅलीचे आयोजन करून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी संपूर्ण देशभरातून काँग्रेस कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. याच महारॅलीत सहभागी होण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार हे आपल्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह राजधानी दिल्ली येथे दाखल झाले आहे.