भ्रष्टाचार करणाऱ्या नगर परिषद कर्मचारी यांना निलंबित करा – नप उपाध्यक्ष शरद जोगी यांची मागणी
कोरपना प्रतिनिधी
नगरपरिषद गडचांदूर येथे मोठ्या प्रमाणात भ्ष्टाचार वाढला असून येथे नुकतेच प्लास्टिक ने भरलेले गाडी येथील नगरपरिषद कर्मचारी कपिल नलेवार व प्रमोद वाघमारे यांनी पकडली होती हा प्रकार 24-08-2022 रोजीचा असून ही गाडी वर्धा येथील व्यपारी सुमित ब्रीजकिशोर बाजोडीया याची होती. त्याची गाडी झुल्लुरबार कॉम्प्लेक्स येथे खाली केल्या जात होती प्लास्टिक पननी असलेली वाहन पकळताच येथे खळबळ माजली असता त्यांना दंड म्हणून आधी 50 हजार चा दंड पावती देण्यात आली मात्र आर्थिक देवाण घेवाण करून दंड लगेच कमी करून 28 हजार दंड ठोठावण्यात आला असता ही बाब शहरात वाऱ्यासारखी पसरली असता येथील समाजसेवी दीपक वर्भे व इतर चार जण यांनी दुसऱ्या दिवशी चंद्रपूर येथे पत्रकार परिषद घेऊन ह्या कर्मचारी याना निलंबनाची मागणी पत्रकार परिषदेतून केली मात्र कोणतीही कारवाई झाली नाही व या प्रकरणाने नगरपरिषद ची व पदाधिकारी याची पण बदनामी होत आहे. हे उपाध्यक्ष शरद जोगी व राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक गटनेता कल्पणा निमजे,मीनाक्षी एकरे, व आणखी एक अश्या नेत्यांनी मुख्याधिकारी याना पत्र देऊन या दोन्ही कर्मचारी याना निलंबन करण्याची मागणी केली आहे.