एचआयव्ही (एड्स) नियंत्रणात युवतींचा सहभाग महत्त्वाचा – श्री शेजव सर, ग्रामीण रुग्णालय आर्णी
आर्णी/यवतमाळ, समीर मलनस
आज श्री.म.द. भारती कन्या कनिष्ठ महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालय आर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने “एकदिवसीय चर्चासत्राचे” आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राचा विषय – “एच.आय.व्ही./ एड्स निर्मूलनात युवतींचे योगदान, कारणे आणि उपाययोजना” होता.
या चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक श्री. शेजव सर, एच.आय.व्ही./एड्स समुपदेशक – ग्रामीण रुग्णालय आर्णी हे होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका आदरणीय सौ. आशाताई प्रियदर्शन भारती मॅडम होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रविशेखर कोटावार सर, तसेच पर्यवेक्षक श्री. प्रेम कुमार नळे सर, तसेच मंचावर उपस्थित प्रा. जाधव सर, प्रा. मोकळे सर, प्रा. मेहर सर, प्रा. कुमारी जाधव मॅडम आणि विद्यार्थी मैत्रिणी उपस्थित होत्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन तथा आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. मनोज सहारे सर यांनी केले.