भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी
विशेष प्रतिनिधी/पंकज रामटेके
गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे वैनगंगा नदीला महापूर आलेला आहे. या महापुराचा फटका पोंभुर्णा तालुक्यातील अगदी नदीकाठावर वसलेल्या गंगापूर टोक या गावाला बसला आहे.
महापुराचे पाणी शेतात तुंबल्याने मोठ्या प्रमाणावर शेतपिकांची नुकसान झाली आहे. शेतकर्यांचे हातचे पिक गेल्याने शेतकरी राजा संकटात सापडला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे प्रत्यक्ष टोक ला जाऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. भेटीदरम्यान गावकर्यांनी आस्थेने आपले अनेक प्रश्न मांडले.
गावामधे येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्याचे बांधकाम व्हावे, महापुरामुळे श्मशानभूमीचे छत क्षतिग्रस्त झाले त्याची दुरुस्ती व्हावी, पिण्याच्या पाण्याच्या आरओ मशिनचे काम यासोबतच पडझड झालेल्या घरांचे त्वरित पंचनामे केल्या जावे अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या प्रसंगीच तहसीलदार पोंभुर्णा यांना भ्रमणध्वनी करून स्थानिक परिस्थितीची माहिती दिली. आणि तातडीने याठिकाणच्या नुकसानग्रस्त शेत्यांची व घरांचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांना केल्या.
यासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून लवकरच सकारात्मक निर्णय घेतल्या जाईल. असेही जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी गावकर्यांना सांगितले. तसेच काही अडचणी आल्यास स्थानिक प्रमुखांच्या माध्यमातून आम्हाला त्वरित कळवावे, आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत. अशी ग्वाही देखील याप्रसंगी टोक वासीयांना दिली.
या भेटीत,भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कु. अल्काताई आत्राम, माजी पं. स. उपसभापती विनोद देशमुख, सुधाकर डायले, प्रभाकर डायले, सौ. कामीनीताई गद्देकार, राजेश मोरपाका, राजू डाकुर यांचेसह आदि मंडळी सोबत होते.