घुग्घुस स्मशानभूमीत लागले अंतविधीचे नवीन दहन कटघर, भाजपाच्या मागणीला यश
पंकज रामटेके/विशेष प्रतिनिधी
घुग्घुस येथील हिंदू व बौद्ध तसेच बेलोरा घाटावरील अंतविधी करण्याचे लोखंडी दहन कटघर लावण्यात आले आहे. या दोन्ही स्मशानभूमीतील कटघर त्वरित दुरुस्त करावे अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी न. प. मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली होती.
याची दखल घेत घुग्घुस न.प.तर्फे याठिकाणी नवीन लोखंडी दहन कटघर शनिवार, २० ऑगस्ट रोजी लावण्यात आले आहे. त्याअनुषंगाने भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी बौद्ध स्मशानभूमीत जाऊन कामाची पाहणी केली.
शहराची लोकसंख्या ५५ हजाराच्या जवळपास असून मोठया संख्येत हिंदू व बौद्ध बांधव वास्तव्यास आहे. शहराच्या मध्यभागी हिंदू व बौद्ध स्मशानभूमी आहे. त्याठिकाणी अंत्यविधी करण्यासाठी लावून असलेले लोखंडी दहन कटघर जुनाट झाल्याने पूर्णतः तुटले त्यामुळे अंत्यविधी करतांना नाहक त्रास सहन करावा लागत असे. ही समस्या लक्षात घेत लोखंडी दहन कटघर त्वरित दुरुस्त करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली होती.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भारतीय बौद्ध महासभेचे सुरेश पाईकराव, दिगांबर बुरड, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, तुलसीदास ढवस, दिलीप कांबळे उपस्थित होते.