पत्रकार पतीने दिली शिक्षिका असणाऱ्या पत्नीला संपवण्याची सुपारी
वणी तालुक्यातील नायगाव बस स्थानकावरून चंद्रपूर येथे जात असताना अज्ञात आरोपीने पाठीमागून हमला केला यात वैषाली (चल्लावार)जितेंद्र मशारकार (40)वर्ष या गंभीर जखमी झाल्या असता त्यांना ताबडतोब घुग्घूस येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.त्या दैनिक महासागरचे संपादक जितेंद्र मशारकर यांच्या पत्नी आहे.
सविस्तर वैषाली चल्लावर (40)वर्ष रा. चंद्रपूर ह्या वणी तालुक्यातील नायगाव येथे जिल्हा परिषेद प्राथमिक शाळा येथे शिक्षिका आहे. त्या रोज चंद्रपूर येथून नायगाव येथे बसनी येणे जाणे करतात.दिनांक 18 ऑगस्ट रोज गुरुवारला नेहमी प्रमाणे त्या शाळेत गेल्या शाळा सुटल्यानंतर त्या 5.30 वाजता दरम्यान चंद्रपूर येथे जाण्यासाठी नायगाव बस स्थानकावर बसची प्रतीक्षा करीत होत्या व चंद्रपूर कडे जाणाऱ्या काही वाहनाना लिफ्ट मागत असताना अचानक अज्ञात आरोपीने पाठी मागून तीक्ष्ण हत्याराने हमला केला यात त्यांच्या मानेवर गंभीर मार लागून त्या खाली कोसळल्या.यावेळी त्या ठिकाणी शाळेच्या व कॉलेजच्या विध्यार्थिनी होत्या. हमला होताच त्या मुलीची पळापळ झाली व घटनेची माहिती नागरिकांना देण्यात आली नागरिकांनी ताबडतोब घटना स्थळाकडे धाव घेतली व आरोपी शेतातून पळून जात असल्याचे लक्ष्यात येताच नागरिकांनी आरोपीचा पाठलाग केला व त्याला पकडले. या घटनेची माहिती घुग्घूस व शिरपूर पोलिसांना देण्यात आली घुग्घूस पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली परंतु आरोपी आढळून आला नाही यामुळे शिरपूर पोलिसांना घटनेची माहिती देऊन घुग्घूस पोलीस परत आले. मात्र नागरिकांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले व चांगलाच चोप देण्यात आला.त्याचवेळेस शिरपूर पोलिस आले व आरोपीला नागरिकांच्या ताब्यातून घेतले आणि घुग्घूस येथे रुग्णालयात आले व उपचार घेत असलेल्या शिक्षिकेचे बयान घेऊन आरोपीलशिरपूर पोलीस स्टेशन नेण्यात आले.
यानंतर आरोपीला विचारपूस करण्यात आली असता पतीनेच पत्नीला संपवण्याची सुपारी दिल्याचे आरोपीने सांगितले यामुळे एकंच खळबळ उडाली.यामुळे आरोपी संजय राजेश पट्टीवार (30) वर्ष रा. चंद्रपूर,महमद राजा अब्बास अन्सारी (20) वर्ष रा. चंद्रपूर मूळ बिहार व जितेंद्र मशारकर (45) वर्ष रा चंद्रपूर या आरोपीना अटक करण्यात आली.
जितेंद्र मशारकर हा दैनिक महासागर या वर्तमान पत्राचा संपादक असून तो पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत असल्याची चर्चा आहे यामुळे त्यांनी पत्नीला मारण्याची सुपारी दिल्याचे सांगितले जाते. या घटनेचा पुढील तपास शिरपूर पोलीस स्टेशनचे एपीआय रामेश्वर कांडुरे करीत आहे.