ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार घुग्घुस शहरातील रेल्वे वाहतूक व जडवाहतुकीच्या संदर्भात समितीचा दौरा संपन्न
पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
घुग्घुस शहरातील रेल्वे वाहतूक व जडवाहतुकीची समस्या सोडविण्याकरीता रविवारी १४ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी बैठक घेतली होती. त्या बैठकीत एक समिती गठीत करण्यात आली होती व या समितीला बुधवारी १७ ऑगस्ट रोजी घुग्घुस येथे जाऊन पाहाणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
त्याअनुषंगाने बुधवार, १७ ऑगस्ट रोजी सकाळी घुग्घुस शहरातील रेल्वे वाहतूक व जडवाहतुकीची समस्या सोडविण्याकरीता भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, तहसीलदार निलेश गौड, सा. बा.वि. कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, प्रकाश अमरशेट्टीवार, ठाणेदार बबन पुसाटे, मंडळ अधिकारी किशोर नवले, तलाठी कार्तिक आत्राम, रेल्वे विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरीत्या पाहाणी केली.
घुग्घुस येथील राजीव रतन चौकातील रेल्वेफाटका जवळील रस्त्याचे दुतर्फीकरण, रेल्वे वाहतूक, जडवाहतूक, सुरू असलेल्या उडाणपूलाच्या कामाचा वेग वाढविणे, शहरालगतच्या बायपास रस्त्याची उर्वरित प्रक्रिया पूर्ण करून रस्ता सुरु करणे व दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करणे, वाहतुक कोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्यासंदर्भात याठिकाणी पाहाणी करून सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच येत्या दि. २१ ऑगस्ट रोजी या पाहाणीचा अहवाल मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना देण्यात येणार आहे.
“समितीचा दौरा सुरु असतांना काँग्रेसच्या नेत्यांनी ज्यांना खूप प्रसिद्धीची हाव आहे प्रसिद्धीच्या हव्यासा पोटी त्याठिकाणी येऊन उपविभागीय अधिकारी यांच्या सोबत फोटो काढला व आपल्या नावाने बातमी प्रकाशित केली. त्यांचे हे केविलवाने कृत्य असून गेल्या अडीच वर्षे त्यांची सत्ता होती परंतु समस्या सोडविण्यासाठी कोणता ही पुढाकार घेतला नाही असे न करता ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निर्देशानुसार आलेल्या समितीच्या अधिकाऱ्यांसोबत आपला फोटो काढला केवळ प्रसिद्धी साठी असे कृत्य केले अडीच वर्षे सत्ता असतांना समस्या सोडविली असती तर त्याठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांना येण्याची गरज पडली नसती असा सवाल भाजपाने केला आहे.”
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे भाजपचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, संतोष नुने, सिनू इसारप, अमोल थेरे, अजय आमटे, हसन शेख, बबलू सातपुते, सुनील बाम, मानस सिंग, संजय भोंगळे, तुलसीदास ढवस, इम्तियाज रज्जाक, कोमल ठाकरे, हेमंतकुमार, वमशी महाकाली, राजेश मोरपाका, रोशन जैस्वाल, शाम आरकिल्ला, कृष्णा शाह, रमेश कोट्टेकोला, रोहित जैस्वाल, शशी बोंगोनी, आशिष चिंचोळकर, रत्नेश सिंग,शिवदत्त यादव, अंकुश गिराम, अनिल सिडाम, अर्जुन गज्जेली, सिनू दुर्गम, श्रीधर करंगले, विनोद शर्मा, सचिन साठे, मेघराज लांजेवार, ओम बनकर, राकेश चिट्टाला, विकास तोडासे, प्रमोद सिद्दम, विकास चटकी, अजय सहानी, उपस्थित होते.