‘अमूल’ नंतर आता या कंपनीने दुधाचे भाव वाढवले, सामान्यांना झटका
इंधन दरवाढीचा टांगती तलवार असतानाच सर्वसामान्यांना दूध दरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. अमूल कंपनीने दरवाढ केल्यानंतर आता गोवर्धन दुधाच्या किमतीत आज मंगळवारी वाढ झाली. सर्वसामान्यांना आज सलग दुसऱ्या दिवशी दूध दरवाढीचा झटका बसला. दुधाचे दर वाढल्याने इतर दुग्धजन्य पदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. दूध दरवाढीने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.
आज गोवर्धन दूधाचा भाव वाढला
सर्वसामान्यांना आज सलग दुसऱ्या दिवशी दूध दरवाढीचा झटका बसला. अमूलने दरवाढ केल्यानंतर पराग मिल्क फूड्स या कंपनीने गोवर्धन दुधाच्या किमतीत दोन रुपयांची वाढ केली आहे. देशातली आणखी एक मोठी दूध उत्पादक आणि वितरक असलेल्या मदर डेअरीने देखील दरवाढीचे संकेत दिले आहेत. या दरवाढीने सामान्यांना मात्र महागाईच चटके बसत आहेत.
‘जीएसटी’तून सरकारची बक्कळ कमाई; सेसमधून प्रथमच मिळाले १० हजार कोटी दुधाचे दर वाढल्याने इतर दुग्धजन्य पदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. दूध महाग झाल्याने तूप, पनीर, लोणी, चीज, लस्सी, आईस्क्रीम, ताक याबरोबरच चहा, कॉफी, मिठाई, चॉकलेटचे भाव वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आजच पेट्रोलियम कंपन्यांनी १९ किलोच्या वाणिज्य वापराच्या सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांची वाढ केली होती. दूध दरवाढीने महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.