भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय कार्यक्रमांची १५०० फुट लांब विशाल तिरंगा यात्रेने सांगता

0
668

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय कार्यक्रमांची १५०० फुट लांब विशाल तिरंगा यात्रेने सांगता

 

पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर :- भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वा अमृत महोत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. चंद्रपूरात माजी खासदार मा. श्री नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकाराने वर्षभरात अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल) साजरा केला. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी समारोपीय कार्यक्रम दिनांक १५ ऑगस्ट २०२२ ला चंद्रपूर शहरात १५०० फुट लांब विशाल “तिरंगा यात्रेच्या माध्यमातून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

आझादी का अमृत महोत्सव समिती चंद्रपूर तर्फे स्थानिक चंद्रपूर येथील ऐतिहासिक गांधी चौकातून विशाल तिरंगा यात्रा काढण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजक तथा अध्यक्ष मा. श्री नरेशबाबू पुगलिया, उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक व वन मंत्री मा. नामदार श्री सुधिर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून विशाल तिरंगा यात्रेला सुरुवात करण्यात आली. व सदर यात्रेचा समारोप विविध प्रकारच्या मिठाई व स्वादिष्ट व्यंजनासह वितरीत करून आंनदोत्सव साजरा केला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी समारोपीय कार्यक्रमात सर्व पक्षातील मान्यवरानी व शेकडो जनतेनी सहभाग होऊन मोठ्या उत्साहात साजरा केला. १५०० फुट लांब विशाल तिरंगा यात्रेत देशभक्ती गीतांच्या निनादात ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम व चंद्रपूर शाळा, महाविद्यालयातील हजारों विद्यार्थीनी सहभाग घेतला. या विशाल तिरंगा यात्रेचे नेतृत्व युवा नेते श्री. राहुलबाबू पुगलिया यांनी केले. म. गांधीजी यांच्या पुतळ्याला मालार्पण करून विशाल तिरंगा यात्रेला सुरुवात झाली. ही विशाल तिरंगा यात्रा गांधी चौक ते जटपुरा गेट मार्ग कस्तुरबा मार्ग ,गिरनार चौक- गांधी चौक येथे समाप्त करण्यात आली. या तिरंगा यात्रेत सर्वश्री गजाननराव गांवडे, माजी महापौर सौ. राखीताई कंचलावार, देवेंद्र बेले, अशोक नागापूरे, करण पुगलिया चंद्रशेखर पोडे, अँड. विजयराव मोगरे, डॉ. मंगेश गुलवाडे, संदीप आवारी, संजय कचलवार, नितिन पुगलिया, वसंत मांडरे, नायरजी, सय्यद रमजान अली, सुर्यकांत खनके, रामदास वादरकर, विरेंद्र आर्या, सुधाकरसिंह गौर, अजय मानवटकर, रोहित पुगलिया, राजू पुगलिया, अनिल तुगीडवार, गजानन दिवसे, स्वप्नील तिवारी, तारासिंग कलसी, अमित पुगलिया, पृथ्वी जंगम, श्रीनिवास पारनंदी, विनोद पिंपळशेंडे, अमोल हलदर, निताई घोष, बाबू भलगट, सुशिल पुगलिया, रतन शिलावार, अजय महाडोळे, सुनिल बकाली, रुपेश शर्मा, असंख्य नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here