अमृत महोत्सव निमित्त लखमापूर ग्रामपंचायत वतीने गावातील युवकांचा सत्कार

0
887

अमृत महोत्सव निमित्त लखमापूर ग्रामपंचायत वतीने गावातील युवकांचा सत्कार

 

लखमापूर :- आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ग्राम पंचायत लखमापूर येथे गुणवंताचा सत्कार समारंभ दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी ग्राम पंचायत लखमापूर व समस्त ग्रामवासी यांचे वतीने प्रशासक नितिन ढवस यांचे हस्ते व गावातील मान्यवर व प्रतिष्ठीत नागरिक यांचे उपस्थितीत पार पडला मुळ लखमापूर येथील अॅड. दिपक यादवराव चटप व भुषण हरिश्चंद्र थिपे सत्कारमुर्ती म्हणून मंचावर उपस्थित होते.

शेतकरी कुटुंबातील अॅड. दिपक यादवराव चटप हा तरूण वकील ब्रिटीश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लिडर ठरला असून जागतिक प्रतिष्ठेच्या 45 लक्ष रुपयांच्या शिष्यवृत्तीचा मानकरी ठरला आहे, त्यांचे उच्च शिक्षण लंडनच्या सीएस या विद्यापिठात होणार आहे. तसेच भुषण हरिश्चंद्र थिपे हा तरूण भौतीक शास्त्र या विषयामधे पुढील उच्च शिक्षणा करिता ल्युसियाना स्टेट युनिव्हर्सिटी, अमेरीका येथे जाणार असून त्यांना या करिता शिष्यवृत्ती मिळालेली आहे.

सदर दोनही तरूण मौजा लखमापूर येथील रहिवासी आहेत, त्यांचा सत्कार समस्त गावकऱ्यांच्या उपस्थितीमधे ग्रामपंचायतीचे वतीने उच्च प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पार पडला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यपाल पिंपळशेंडे उपस्थित होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायतीचे प्रशासक नितिन ढवस, ग्रामपंचायतीचे सचिव श्रीहरी केंद्रे, शाळेच्या मुख्यध्यापीका उरकुडे मॅडम, तंटामुक्ती अध्यक्ष पुरषोत्तम पिंपळशेंडे, प्रतिष्ठीत नागरीक दादाजी आस्वले, येवले मॅडम, सर्व अंगणवाडी सेविका, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व शिक्षक वृंद उपथित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here