भव्य-दिव्य रॅलीनी दुमदुमली गडचांदुर नगरी

0
819

भव्य-दिव्य रॅलीनी दुमदुमली गडचांदुर नगरी

 

 

प्रवीण मेश्राम/कोरपना

आजादी का अमृत महोत्सव सामाजिक ऐक्य आणि देशप्रेमाची अद्भुत अनुभूती भव्य तिरंगा रॅली—

गडचांदूर शहरवासीयांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 13 /8 /2022 ला सकाळी 10:30 च्या दरम्यान स्व. भाऊराव पाटील चटप आश्रम शाळेच्या प्रांगणातून तिरंगा सन्मान रॅलीला सुरुवात झाली… त्यानंतर लगेचच अवघ्या काही अंतरावरच असलेल्या अचानक दुर्गा माता मंदिरा समोर राष्ट्रगीताचं गायन करण्यात आलं… यावेळी नेतृत्वाच्या भूमिकेत सत्यजीत आमले ठाणेदार गडचांदूर यांनी संचालनाचं कार्य पार पाडून रॅलीविषयी मार्गदर्शनपर सूचना केल्या.

शहरातील राजकीय क्षेत्रातील ,सामाजिक क्षेत्रातील, वैद्यकीय क्षेत्रातील, व्यावसायिक क्षेत्रातील, पोलीस दलातील नामांकित मंडळी तथा अनेक शहरवासी, विद्यार्थी आणि महिला मंडळी आवर्जून उपस्थित होती.

असू दे तुझा हिरवा प्यारा,
असू दे तुझा निळा न्यारा,
असू दे तुझा भगवा सूनहरा,
सबसे प्यारा तिरंगा हमारा
रॅलीच्या दर्शनी भागासमोर देशभक्तीपर गीतांच्या सुमधुर आणि स्फूर्तीदायी आवाजात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने वाटचाल सुरू होती… सहभागी अनेकांच्या चेहऱ्यावर उत्साह, नवचेतना ओसंडून वाहत होती.

अनेक फेटेधारी महिलां आपल्या आकर्षक वेशभूषेतून रॅली
ची शोभा वाढवित होत्या तर भारतमातेच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी ही लक्ष वेधून घेत होती.

शहरातील रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरातूनच काही मंडळी या सन्मान रॅलीच्या आनंद घेत होती… काही जण तर या रॅलीचा चित्रीकरण कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न करीत होती…
रॅलीतील उत्साह बघून आपणही या रॅलीमध्ये सहभागी व्हायला हवं होतं, कदाचित अशी खंत त्यांना वाटत असावी….
या तिरंगा सन्मान रॅलीच्या निमित्ताने अनेकांना आपले शालेय दिवस आठवले असतीलच… प्रभातफेरी दरम्यान स्वातंत्र्याच्या जयघोष करीत माहोल करणाऱ्या बालपणीच्या त्या दिवसांच्या आठवणींना नक्कीच उजाळा मिळाला.

वंदे मातरम!!
भारत माता की जय!!
हर घर तिरंगा लगाना है!!
भारत की शान बढाना है!!
अशा जयघोषपर नाऱ्यांच्या घोषणेसह रॅलीतील सहभागी मंडळी आपला उत्साहपूरक आनंद वृद्धिंगत करीत होती….
दरम्यानच्या काळात आज सूर्यदेवही जास्तच प्रभावीत होता, तरीपण त्या उष्णतामय गर्मीची तमा न बाळगता सर्वजण देशभक्तीने प्रेरित होऊन मार्गक्रमण करीत होती.

अनेक सामाजिक संघटनांनी ठीकठिकाणी पिण्याच्या पाण्याची, चॉकलेट, केळ ,मसाला भात इत्यादींच्या रूपात नाश्त्याची सोय केलेली होती… आयोजक सहभाग्यांची गैरसोय होऊ नये यांची कटाक्षाने काळजी घेत आपली सामाजिक बांधिलकी जपत होते.

एकदम मस्त माहोल मध्ये सुरू असलेल्या या रॅलीची सांगता अचानक दुर्गा मंदिरा जवळ राष्ट्रगीताने करण्यात आली. शेवटी या रॅलीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभागी झालेल्या, परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आयोजकांनी व व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष यांनी आभार मानले. एकंदरीत गडचांदूर शहरातील आजवर झालेल्या रॅली मधील हि एक लक्षवेधी ठरली, याबद्दल तिळमात्र शंका असण्याचं कारण नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here