स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त वृक्षारोपण
पाचगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पर्वावर अंबुजा सिमेंट फाॅऊडेशन उप्परवाही (उत्तम कापूस उपक्रम) व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पाचगाव यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला माजी पंचायत समिती सदस्या सुनंदा देवराव डोंगे, आत्मा कृषी संचालन मंडळ राजुराचे अध्यक्ष तिरुपती इंदूरवार, भेंडवी सोसायटी अध्यक्ष शंकर गोनेलवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यपाल चापले, मुख्याध्यापक अमर पाझरे सर, पोलिस पाटील शंकर खामनकर, अंबुजा सिमेंट फाॅऊडेशन ऊप्परवाहीचे प्रक्षेत्र अधिकारी गोपाल जंबुलवार, प्रक्षेत्र अधिकारी रुपेश गेडेकर, उमेश गोनेलवार, संजय पुप्पलवार, संतोष कोहपरे, किसन पिंपळकर, मारोती मादनेलवार, बोबडे सर, कुडसंगे सर, जाधव सर, खावसे सर, बैस सर, दुधे सर, कोहपरे मॅडम, रुपेश पुलगमवार, प्रशांत भेंडे, दिलीप वडस्कर, संतोष जीवतोडे, विनोद भिवनकर व गावातील बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.