श्री सुनील भगवंतराव टोके, निलंबित सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मुंबई पोलीस दल, मुख्य नियंत्रण कक्ष, मुंबई यांनी मांडले आपले मनोगत व काढले पाेलिस दलाचे/विभागाचे वाभाडे/गैरप्रकार !!
दिवंगत आदरणीय श्रीमान विनायक मेटे यांचे दुखद निधन
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: दिवंगत आदरणीय श्रीमान विनायक मेटे यांचा बळी राज्य सरकारने व केंद्रीय सरकारने आणि या दोन शासनाच्या हायवे स्टेट ट्रॅफिक विभागातील मा पोलीस महासंचालक व त्यांच्या विविध पदांवरील आयपीएस आणि मपोसे पदांवरील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी घेतलेला आहे हे माझे ठाम वयक्तिक मत व विश्वास आहे.
मुंबई पुणे महामार्गावर येणाऱ्या टोल नाका खालापूर व नंतर तळेगांव येथील टोल नाक्यावर महामार्ग सुरक्षा वाहतूक विभाग येथील नेमणुकीस असलेले पोलीस अधिकारी कर्मचारी हे टोल नाक्यावर कशी वसुली करतात हे तेथील आरबीआय कर्मचारी व सर्वसामान्य जनतेला माहीत आहे. तेथील सिसि टीव्ही फुटेज केल्यावर सर्व समजेल.
पुणे मुंबई महामार्गावर(एक्सप्रेस) वे वर येथील आरबिआय कंपनी कडून जो भरमसाठ टोल वसुलीचा प्रचंड वसुली चा पैसा कुठे जातो, या महामार्गावर फूड मॉल आहेत मात्र हॉस्पिटल नाही हे महत्वाच काम,गरज असताना सुद्धा महाराष्ट्र राज्याचे राज्यशासन व परिवहन मंत्री तसेच केंद्रीय मंत्री आणि यांचे प्रशासन नक्कीच कुंभकर्ण झोपले आहे असे माझे वयक्तिक मत असून या मतावर मी ठाम आहे.
बोरघाट परिसरात खाला पूर टोल नाका ते लोणावळा व तळेगाव टोल नाका परिसरात अवजड वाहतूक करणारे ट्रक,कंटेनर ट्रक चालक सदर ठिकाणी कसे स्वतःची वाहन चालवतात, कोणत्या लेन मधून बेदरकार पणाने चालवतात याची इत्यभूत माहिती महामार्ग सुरक्षा वाहतूक विभागाचे प्रमुख, त्याच्या अखत्यारीत काम करणाऱ्या सर्व आयपीएस व मपोसे पदांवरील अधिकारी कर्मचारी याना 100000% माहीत आहेच आणि हेच सत्य राज्य शासनाचे परिवहन मंत्री व केंद्रातील श्री नितिन गडकरी यांना ही माहीत आहे फक्त रस्ते अपघात झाल्यावर जो कोणी गोरगरीब किंवा आदरणीय श्री विनायक मेटे सारखे नाहक बळी गेल्यावर दुःख व्यक्त करणे,चौकशी करण्याचे आश्वासन देणे का? तर मीडिया मध्ये जो पर्यंत ही बातमी ब्रेकीग न्यूज म्हणून चालवली जाते तो पर्यंत.